Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सर्वसामान्यांचे प्रेम हेच खरे समाधान ः प्राचार्य शिवाजीराव भोर

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः  रयत शिक्षण संस्था ही जनसामांन्याची संस्था म्हणून अनेक वर्षे काम केले.चांगले काही करता आले,त्यातील हजारो लोक मनापासून प्रे

कर्जतमध्ये दहा लाखांची लूट ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
चासनळी व परिसरातील भाविकांची नर्मदा परिक्रमा उत्साहात
तळेगाव दिघेमध्ये फोडले बँकेचे एटीएम

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः  रयत शिक्षण संस्था ही जनसामांन्याची संस्था म्हणून अनेक वर्षे काम केले.चांगले काही करता आले,त्यातील हजारो लोक मनापासून प्रेम करतात हेच जीवनातले खरे समाधान आहे, असे मत रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव व बोरावके कॉलेजचे माजी प्राचार्य शिवाजीराव भोर यांनी व्यक्त केले.
येथील विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान व वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे माजी प्राचार्य शिवाजीराव भोर यांचा बोरावकेनगरमधील विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान कार्यालयात  सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. सुखदेव सुकळे यांनी स्वागत, प्रास्ताविक करून सांगितले की, प्राचार्य शिवाजीराव भोर यांच्यासारखी रयतनिष्ठ, ज्ञानतपस्वी, माणुसकीसंपन्न व्यक्तिमत्वे ही रयतसेवकांचे आधार आणि प्रेरणास्थान असल्यामुळेच आमच्यासारखी गोरगरीब माणसे शिक्षणक्षेत्रात काही चांगले काम करू शकलो, त्यांनी शेकडो लोकांना संस्थेत सामावून घेतले, दुर्लक्षित गरीब माणसांना जवळ केले. हेच त्यांचे ऋण मोठे असल्याचे सुकळे यांनी सांगितले व सत्कार केला. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, प्राचार्य शिवाजीराव भोर यांचे हसतमुख व्यक्तिमत्व आणि शिस्तबद्ध प्रशासन यामुळे त्यांच्या काळात अनेक शैक्षणिक, सामाजिक उपक्रम दिशादर्शक ठरले, त्यांनी राष्ट्रीय पातळीवर घेतलेल्या खेळस्पर्धा लक्षणीय ठरल्या आहेत. संकुलातील शिक्षणविस्तार उपक्रमाचे कौतुक केले. असे सांगून डॉ. उपाध्ये यांनी प्राचार्य भोर यांचा सत्कार केला. प्राचार्य शिवाजीराव भोर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मी सामान्य माणूस आहे. परिश्रमाने, शिक्षणामुळे जीवनाचा अर्थ कळला. रयत शिक्षण संस्थेने माझ्या जीवनाला प्रतिष्ठा दिली. गोरगरिबांची काही कामे करता आली, यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण, शरदराव पवार, अ‍ॅड, रावसाहेब शिंदे यांच्या आठवणी सांगितल्या. कर्मवीरांनंतर रयतला सेवाभावी माणसं मिळाली, त्यामुळे रयतेचा विकास झाल्याचे सांगून विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठान, वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे झालेला सत्कार हा मोठा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब बुरकुले, उज्ज्वलाताई बुरकुले, संजय बुरकुले, सुरेखा बुरकुले, संकेत बुरकुले, सुयोग बुरकुले यांनी नियोजन केले. केडगाव येथील अनुराधा शिंदे व कार्तिक शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.सूत्रसंचालन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले तर उज्ज्वलाताई बुरकुले यांनी आभार मानले.

COMMENTS