Homeताज्या बातम्यासंपादकीय

भारतीय हरितक्रांतीचा जनक

खरंतर एकेकाळी समृद्ध आणि संपन्न असलेला भारत देश इंग्रजांच्या राजवटीमुळे अतिशय कंगाल झाला होता. येथील जनतेला पुरेसे अन्न मिळत नव्हती. अशा परिस्थित

शरद पवारांची राजकीय चाल
एकीकडे दिलासा दुसरीकडे टांगती तलवार
दहशतवादाची कीड ठेचण्याचे आव्हान

खरंतर एकेकाळी समृद्ध आणि संपन्न असलेला भारत देश इंग्रजांच्या राजवटीमुळे अतिशय कंगाल झाला होता. येथील जनतेला पुरेसे अन्न मिळत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यानंतर येथील जनतेचा भूकेचा प्रश्‍न मिटवण्याचा सर्वात मोठे आव्हान तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यासमोर होते. एकतर गहू लागवडीचा समृद्ध असा पट्टा पाकिस्तानमध्ये गेला होता, त्यामुळे अन्नधान्यांचे प्रचंड संकट भारतावर ओढवले. त्यामुळे नेहरू यांनी अमेरिकेशी पीएल-480 करत अमेरिकेकडून गहू मागविला. हा गहू अतिशय नित्कृष्ट असा गहू होता, भारतीयांची भूक भागविण्याची तेव्हा गरज होती. मात्र त्यानंतर म्हणजे 1965 नंतर भारताने हरितक्रांतीच्या दिशेने पाऊले टाकण्यास सुरूवात केली. अमेरिकन कृषीतज्ज्ञ नॉर्मन बोरलॉग यांनी विविध जातींचा संकर करून, जास्त उत्पादन देणार्‍या जाती शोधून काढल्या. तर भारतीय शास्त्रज्ञ डॉ. स्वामीनाथन यांनी या जातींचा संकर करून भारतीय जाती विकसित करून, भारताला अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले. भारत आजही 143 कोटी जनतेला अन्नधान्य पुरवून इतर देशांमध्ये अन्नधान्यांची निर्यात करतो, त्याचे श्रेय डॉ. स्वामीनाथन यांनाच जाते. नुकतेच त्यांचे निधन झाले आहे. त्यांचे भारतीय कृषीतील योगदान विसरता येण्याजोगे नाही. स्वातंत्र्यानंतरची 18 वर्षे आपण आयात अन्नधान्यांवर अवलंबून होतो. भारतात परदेशातून अन्नधान्य आले तरच, घरातील चूल पेटायची, अशी अवस्था होती. मात्र हे चित्र 1957-58 पासून हळूहळू बदलू लागले. इंडियन अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेने या प्रश्‍नावर लक्ष केंद्रित केले. त्याचप्रमाणे पंतनगर व लुधियाना येथे कृषिविद्यापीठे स्थापन झाली. अखिल भारतीय पातळीवर विविध पिकांसाठी समन्वयित प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले. सर्व राज्यातील नव्या कृषिविद्यापीठांची साखळी बांधली गेली. शिक्षण, संशोधन व विस्तार यांचा मिलाफ झाला. मोठ्या प्रमाणात गहू, भात, ज्वारी, बाजरी, मका यांच्या संकरीत व उन्नत वाणाची क्षेत्रीय प्रात्यक्षिकं योजिली गेली. लाखो पथदर्शी प्रकल्प साकार झाले. त्यामुळे 1965 ते 1970 च्या दशकांमध्ये भारत अन्नधान्यांमध्ये स्वयंपूर्ण झाला आणि भारताला अन्नधान्यांची आयात थांबवाली लागली, याचे संपूर्ण श्रेय स्वामीनाथन यांना जाते. स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 रोजी तामिळनाडूतील तंजावूर येथे झाला होता. त्यांना 1997 मध्ये पद्मश्री, 1972 रोजी पद्मभूषण आणि साल 1989 मध्ये पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते. शेती क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे त्यांनी जगभरात सन्मान मिळाला होता. 1949 मध्ये बटाटा, गहु, तांदुळ आणि ज्युट यांच्या गुणसूत्रांवर संशोधनाने करीयरची सुरुवात केली होती. हरित क्रांती कार्यक्रम अंतर्गत त्यांनी अधिक उत्पन्न देणार्‍या गव्हाच्या आणि तांदळाच्या जाती शोधून काढल्या. त्यांच्यामुळे सामान्य शेतकर्‍यांना फायदा झाला असून भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला. स्वामीनाथन यांनी 1943 मध्ये बंगालमध्ये पडलेल्या दुष्काळ आणि देशातील अन्नधान्याच्या टंचाईचा अनुभव आल्यानंतर त्यांनी कृषिक्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी झुलॉजी, एग्रीकल्चर दोन्ही विषयात विज्ञानात पदवी संपादन केली होती. खरंतर स्वामीनाथन केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन ते भारतीय पोलीस सेवेसाठी पात्र ठरले, मात्र त्यांनी पोलीस ऑफिसर न होता कृषी क्षेत्रात संशोधन करायचे ठरवले. नेदरलँडमध्ये बटाटाच्या अनुवांशिकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांना मिळालेल्या शिष्यवृत्तीतून त्यांनी 1952मध्ये पीएच.डी. केले आणि परदेशांत विविध संधी असतांनाही ते भारतात परतले. जगभरांतील कृषी विद्यार्थ्यांबरोबर त्यांनी कृषिसंशोधनाबरोबर वनस्पतींची पैदास आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन या विषयांवर काम केले आहे. भारतीय गरीब शेतकर्‍यांच्या शेतांत गव्हाचे व तांदळाचे उच्च उत्पन्न देणारे वाण पेरून हरितक्रांती घडवून आणण्याचे श्रेय स्वामीनाथन यांनाच जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच गहू व तांदूळ यांच्या उत्पादनांत भारत स्वयंपूर्ण होऊ शकला. 

COMMENTS