Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आंबेवाडी तांडा येथे बिबट्याचे दर्शन

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची ग्रामपंचायत सदस्य मयूर चव्हाण यांची वनविभागाकडे मागणी

पाथर्डी प्रतिनिधी - शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबेवाडी तांडा परिसरात ३१ जानेवारी रोजी बिबट्याने रात्रीच्या सुमारास पाळीव कुत्र्याच

कोपरगाव शहरातील गोळीबार प्रकरणी दोन्ही गटातील आठ आरोपींना अटक  
संत ज्ञानेश्‍वर स्कूलमध्ये स्वातंत्र दिन उत्साहात
सेवानिवृत्त पोलिस कर्मचार्‍याचा मृत्यू ह्र्दयविकारा मुळेच  

पाथर्डी प्रतिनिधी – शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबेवाडी तांडा परिसरात ३१ जानेवारी रोजी बिबट्याने रात्रीच्या सुमारास पाळीव कुत्र्याची शिकार केल्याची प्राथमिक माहिती गावकऱ्याकडून मिळाली आहे;दरम्यान वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी आंबेवाडी येथे भेट दिली असून आंबेवाडी ग्रामपंचायतचे सदस्य मयूर चव्हाण,अनिल चव्हाण,योगेश राठोड,तुषारकुमार चव्हाण,शिवप्रसाद राठोड,करण चव्हाण,सौरभ राठोड यांनी त्यांच्याकडे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

याबद्दल अधिक माहिती देताना आंबेवाडी ग्रामपंचायत सदस्य मयूर चव्हाण यांनी सांगितले की,३१ जानेवारी रोजी गावातील पाळीव कुत्र्यावर हल्ला करत त्याची शिकार केल्याचे गावकऱ्यांच्या १ फेब्रुवारी (गुरुवारी) सकाळी निदर्शनास आले त्यानंतर तीन दिवसांपूर्वी आंबेवाडी गावाच्या मागील बाजूस बिबट्या गावकऱ्यांना निदर्शनास आला.शनिवारी पुन्हा योगेश सुभाष राठोड शेतात पाणी देण्यासाठी जात असताना त्यांना बिबट्याचे दर्शन झाल्याने गावातील बिबट्याच्या वावराने गावकरी भयभीत झाले असून वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करत गावकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी शेवटी केली आहे.

सदरील घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी वनविभागाची कर्मचारी पुन्हा तिथे जाणार असल्याची माहिती तिसगाव रिजनचे अधिकारी वाघूलकर यांनी दिली आहे.

COMMENTS