सेवेतील अधिकार्‍याचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास मिळणार नोकरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सेवेतील अधिकार्‍याचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यास मिळणार नोकरी

राज्य सरकारचे नवे अनुकंपा धोरण जाहीरमुंबई : राज्यातील कोविड परिस्थितीमुळे अनेक अधिकार्‍यांचा मृत्यू झाला असून, आपल्या कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकर

Osmanabad : परंड्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी
धूळमुक्त बाजारपेठेसाठी नगरमध्ये सह्यांची मोहीम
तब्बल 21 लाख दिव्यांनी उजळून निघणार उज्जैन

राज्य सरकारचे नवे अनुकंपा धोरण जाहीर
मुंबई : राज्यातील कोविड परिस्थितीमुळे अनेक अधिकार्‍यांचा मृत्यू झाला असून, आपल्या कुटुंबातील सदस्याला सरकारी नोकरी देण्याची मागणी अधिकारी संघटनेनी केली होती. अखेर राज्य सरकारने सेवेत असणार्‍या अधिकार्‍याचा मृत्य झाल्यास कुटुंबातील सदस्याला नोकरी मिळणार असल्याचे जाहीर केले. यामुळे राज्यातील अधिकार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सध्या शासकीय सेवेतील एखाद्या गट क किंवा गट ड कर्मचार्‍याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्याला अनुकंपा तत्वावर शासकीय सेवेत नियुक्ती देण्यात येते. आज राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे की, गट अ आणि गट ब मधील अधिकार्‍यांच्या बाबतीतदेखील हे अनुकंपा धोरण लागू करावे. कोविड परिस्थितीत अनेक अधिकार्‍यांचे निधन झाले असून अधिकारी संघटनांची देखील हे अनुकंपा धोरण लागू करण्याची मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी या मागणीप्रमाणे कार्यवाही करण्याची सूचना केली होती. त्या अनुषंगाने आज यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आणण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील अधिकार्‍यांच्या निधनामुळे ओढवणार्‍या आर्थिक आपत्तीतून त्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. गट अ किंवा गट ब मधील अधिकार्‍याचे निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यास गट क किंवा गट ड मध्ये अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येईल. याशिवाय अनुकंपा नियुक्तीसाठीचे विविध आदेश एकत्रित करून महाराष्ट्र राज्य शासन अनुकंपा नियुक्ती नियम 2021 तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे, यामुळे अनुकंपा संदर्भातील प्रशासकीय अडचणी दूर होणार आहेत.

COMMENTS