Homeताज्या बातम्याविदेश

कोलंबियात भूस्खलनामुळे 33 जणांचा मृत्यू

बोगोटा - कोलंबियात मुसळधार पावसामुळे भूस्खलन होवून 33 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना कोलंबियांची राजधानी असलेल्या बोगोटापासून 230 किलोमीटर अंतर

गोदावरी कालव्यांना ओव्हर फ्लोचे पाणी द्या
शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उद्या २७ सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’ला अहमदनगर जिल्हा काँग्रेसचा सक्रीय पाठिंबा : बाळासाहेब साळुंके
भाजपमध्ये या, अन्यथा जेलमध्ये जा असा काळ

बोगोटा – कोलंबियात मुसळधार पावसामुळे भूस्खलन होवून 33 जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना कोलंबियांची राजधानी असलेल्या बोगोटापासून 230 किलोमीटर अंतरावर घडली आहे. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले. येथील परिसरात बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.ढिगा-यातून बाहेर काढलेल्या नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील काही जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. कोलंबियाचे राष्ट्रपति गुस्तावो पेट्रो यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

COMMENTS