Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चैत्यभूमीवर उसळला लाखोंचा भीमसागर

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आंबेडकरी अनुयायांची गर्दी

मुंबई प्रतिनिधी - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा भीमसागर मंगळवारी चैत्यभूम

शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही मोठे झालात त्यावर बोलायचा तुम्हाला अधिकार नाही l LOK News 24
बायकोला अमानुष मारहाण ; नराधम पतीचा व्हिडीओ व्हायरल I LOKNews24
श्री नागेश विद्यालयाचे नाव झळकले इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये

मुंबई प्रतिनिधी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी लाखोंचा भीमसागर मंगळवारी चैत्यभूमीवर उसळल्याचे दिसून आले. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे आंबेडकरी अनुयायांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर जाता आले नव्हते. मात्र यंदा कोणतेही निर्बंध नसल्यामुळे लाखों भीमसैनिक चैत्यभूमीवर मोठया संख्येने एकवटल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्राच्या काना-कोपर्‍यातून जत्थेच्या जत्थे चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दाखल झाले होते.


मंगळवारी सकाळीच चैत्यभूमीवर आंबेडकरी अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. तान्हुल्यापासून वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटांतील अनुयायांच्या चैत्यभूमीवर रांगा लागल्या आहेत. पालिकेतर्फे या सर्वांसाठी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. चैत्यभूमीच्या दिशेने येणारे अनुयायांचे जथ्थेच्या जथ्थे व त्यांना शिस्तीने सोडणारे स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था, संघटना, चळवळीतील कार्यकर्ते, दादर रेल्वे स्थानक ते चैत्यभूमी-शिवाजी पार्कच्या दिशेने अत्यंत शिस्तीने चालणारे लाखो भीमसैनिक पोलिसांना सहकार्य करताना दिसत आहेत. शिवाजी पार्क मैदानात धूळ उडून अनुयायांना त्रास होत असल्याने पालिकेने यंदा कृत्रिम हिरवळ मैदानात अंथरली आहे. अनुयायांसाठी शिवाजी पार्क येथे तात्पुरता निवारा, शामियाना उभारण्यात आला आहे. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरत्या निवार्‍याची परिसरातील पालिकेच्या सहा शाळांमध्ये सोय करण्यात आली आहे. चैत्यभूमी परिसर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर, दादर रेल्वे स्थानक, राजगृह (हिंदू कॉलनी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) व लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) येथे आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.  


चैत्यभूमी परिसरात प्रबोधनपर मार्गदर्शन शिबिरे, क्रांतीगीतांच्या ध्वनिफिती, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या साहित्य, महामानवाच्या प्रतीमा व पुतळे खरेदी करण्यासाठी स्टॅालवर गर्दी उसळली आहे. शिवाजी पार्क मैदान व इतरत्र सुमारे 200 ते 300 पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. राज्याच्या विविध भागांतून नामवंत प्रकाशन संस्थांनी यात सहभाग घेतला आहे. आंबेडकर, बुद्ध, यांसह पुरोगामी विचारधारेची लाखो पुस्तके येथे उपलब्ध आहेत. 

COMMENTS