Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लातूर अर्बन को-ऑप बँकेला 20.75 कोटी नफा

लातूर प्रतिनिधी - महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकेत अग्रेसर असलेली व बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र असलेल्या लातूर अर्बन को-ऑप बँकेला साल सन 2022

मारुती महाराज कारखान्याने दिला 2555 रुपये भाव
द्वारकादास शामकुमारतर्फे पाणपोईचे उद्घाटन
डॉ.सोमनाथ पचलिंग यूजीसी -नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन

लातूर प्रतिनिधी – महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकेत अग्रेसर असलेली व बँकेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र असलेल्या लातूर अर्बन को-ऑप बँकेला साल सन 2022-2023 या आर्थिक वर्षात रुपये 20 कोटी 75 लाख मात्रचा नफा झाला आहे. बँकेचा एकूण व्यवसाय रुपये 1200 कोटी आहे. बँकेने परंपरेप्रमाणे एनपीए 0.00 टक्के राखले आहे. बँकेचे एकूण ठेवी रुपये 692 कोटी व कर्जे रुपये 423 कोटी आहे. बँकेस मागील आर्थिक वर्षात महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशनचा उत्कृष्ट नागरी सहकारी बँक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. बँकेने सूरवाती पासून आज पर्यंत ऑडिट वर्ग ‘अ’ प्राप्त केला आहे. बँकमागील दोन वर्षांपासून सभासदांना 10 टक्के डिव्हीडंट देत आहे. बँकेचे एकूण 16 शाखा कार्यरत असून नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सांगलीची नवीन शाखेची परवानगी मिळाली आहे. दोन नवीन शाखेचा प्रस्ताव आरबीआय कडे प्रलंबित आहे. बँकेची हि प्रगती मध्ये सभासद, खातेदार, ठेवीदार व हितचिंतकांची समर्थ साथ मिळाल्याने बँकेचा प्रगतीचा आलेख सतत चढत्या दिशेने वाटचाल आहे. बँकेची हि प्रगती मध्ये सभासद, खातेदार, ठेवीदार, कर्जदार, बँकेचे माझे सहकारी संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांचे आभार आहे सदरील माहिती बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा अध्यक्ष प्रदिपकुमार राठी यांनी दिली. या वेळी बँकेचे उपाध्यक्ष सीए लक्ष्मीरमण मालू, बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी वाय. एस. मशायक, उप-मुख्यकार्यकारी अधिकारी एन. जे. भंडारी उपस्थित होते.

COMMENTS