राष्ट्रवादीचे माजी स्थायी समिती सभापती घुलेंवर टक्केवारीचा आरोप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीचे माजी स्थायी समिती सभापती घुलेंवर टक्केवारीचा आरोप

अहमदनगर/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले यांच्यावर टक्केवारी मागितल्याचा आरोप मनपाची

किर्तनाच्या क्लिप्स YouTube वर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्मतील | LOKNews24
पाथर्डी तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने ठोकले शतक;याला जबाबदार कोण?
तरूणांनी धार्मिक कर्मकांडातून बाहेर पडावे ः राजन खान

अहमदनगर/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले यांच्यावर टक्केवारी मागितल्याचा आरोप मनपाची विकास कामे करणार्‍या ठेकेदाराने केला आहे. याबाबत त्याने मनपाकडे चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे तसेच पोलिस अधीक्षकांनाही निवेदन देऊन संबंधित नगरसेवक घुलेंवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
नगरसेवक घुले यांच्याकडून त्यांच्या माळीवाड्यातील प्रभागात कामे करण्यासाठी टक्केवारीची मागणी करण्यात आल्याची व टक्केवारीपोटी दीड लाख रुपये देऊनही अतिरिक्त रकमेची मागणी करीत असल्याप्रकरणी ठेकेदाराने मनपा आयुक्त व जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीमुळे मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे. ठेकेदार इरफान कासम शेख यांनी ही तक्रार केली आहे.
या तक्रारीत शेख यांनी म्हटले आहे की, माझे स्वतःचे रजिस्ट्रेशन नसल्यामुळे विविध मजूर संस्था व शाहनवाज शेख यांच्या नावावर मी काम करतो. कित्येक वर्षापासून मंजूर संस्था व शाहनवाज शेख यांच्या नावावरचे देयक काम करुन सुध्दा मिळाले नाही. मी प्रभाग 11 मधील हातमपुरा-कमला नेहरू पार्कमधील वॉल कम्पौंड व काँक्रीटीकरणाचे काम शाहनवाज शेख यांच्या नावावर घेतले. ते काम पूर्ण केले. काम करताना अविनाश घुले हे कामावर येऊन मला धमकावत होते व पैशाची मागणी करीत होते. हे काम माझ्या प्रभागात आहे. तू या कामाचे 15 टक्के मला दे. पैसे न दिल्यास मी कामाचे देयक काढताना अडवणूक करेल. तसेच वारंवार फोन करून धमक्या देत होते. माझ्या प्रभागात ऑनलाईन काम भरायचे नाही. तू ज्या संस्थेवर काम करीत आहे, त्या संस्थेला ब्लॅक लिस्टमध्ये टाकेल, असे म्हणत दहशत निर्माण करत आहे, असे तक्रारीत नमूद केले आहे. 2020-2021 या कालावधीत प्रभाग 11 मध्ये 10 लाखांची कामे मी शाहनवाज शेख यांच्या नावावर केलेली आहेत. दीड लाख रुपये नगरसेवक अविनाश घुले यांनी माझ्याकडून घेतले. तरीही माझी अडवणूक करुन दामदाटी करीत वारंवार फोन करुन पैशांची मागणी करीत आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून नगरसेवक अविनाश घुले हे धमकावून पैसे घेत आहेत. त्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला असून, माझे सर्व कुटूंब दहशतीत आहे. त्यामुळे नगरसेवक घुले यांची चौकशी करुन कारवाई करावी, असे शेख यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तसेच नगरसेवक घुले यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शेख यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.

नगरसेवकपद रद्दची मागणी
नगरसेवक ठेकेदाराला धमकावून टक्केवारी मागत असल्याने घुले यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी ठेकेदार शेख यांनी केली असून, या नगरसेवकावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. पैसे न दिल्याने नगरसेवक घुले धमकावत असल्याच्या निषेधार्थ त्यांचे पद रद्द करण्याच्या मागणीसाठी मनपा उपायुक्त प्रदीप पठारे यांना निवेदन ठेकेदार इरफान शेख (रा. झेंडीगेट) यांनी दिले. यावेळी जरीन शेख, सर्फराज सय्यद, फैजान शेख, सुलतान शेख, शहनवाज शेख, फर्मान शेख, ऐसान शेख आदी उपस्थित होते. 2020-21 या कालावधीत प्रभाग क्र.11 मध्ये 6 लाख 50 हजार अंदाजे रक्कमेचे काम शहानवाज शेख यांच्या नावावर केलेले असताना रक्कम रुपये 1 लाख 50 हजार नगरसेवक अविनाश घुले यांनी माझ्याकडून टक्केवारीच्या स्वरूपात घेतलेले आहेत व माझी अडवणूक करून दमदाटी करून वारंवार फोन करून आणखी पैशाची मागणी करीत आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

तक्रारींच्या रागातून आरोप : घुले
प्रभागातील कामे दर्जेदार व्हावीत, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. कामे दर्जेदार करण्यासाठी महापालिका यंत्रणेमार्फत जो ठेकेदार असेल, त्यांना वारंवार सूचना देतो. मात्र, ज्या ठेकेदाराने माझ्यावर आरोप केले आहेत, त्या ठेकेदाराच्याविरोधात महापालिकेतील अनेक नगरसेवकांनी लेखी तक्रारी केल्या आहेत. त्या रागातून आपल्यावर खोटे आरोप होत असल्याचा खुलासा नगरसेवक अविनाश घुले यांनी केला आहे.

COMMENTS