Homeताज्या बातम्यासंपादकीय

भाजप सत्ता आणि वाद

अलीकडच्या काळात भाजपचे नेते सत्तेपासून दूर जाण्याच्या दिशेने वाटचाल करू लागले आहेत. सध्या सत्तेत असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकारी व लो

राष्ट्रवादीतील कलह
राज्यपाल-सरकार संघर्ष
धरणग्रस्त पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत…  

अलीकडच्या काळात भाजपचे नेते सत्तेपासून दूर जाण्याच्या दिशेने वाटचाल करू लागले आहेत. सध्या सत्तेत असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकारी व लोकप्रतिनिधींनी माध्यमांसह महापुरुषांवर गरळ ओकण्याचा जणू काही ठेकाच घेतला आहे, असे जाणवू लागले आहे. छोट्या पक्षाच्या नेत्यांसह आमदार-खासदारांविरोधात विविध संस्थांनी कारवाई करण्याचा घाट घातल्याचे दिसून आले आहे. यावरून प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या प्रतिक्रियावर आता भाजपचे पदाधिकारी, मंत्री, आमदार, खासदार आपला राग व्यक्त करू लागले आहेत. त्याचीच झलक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा जनतेला दिली आहे. यावरून सध्या भाजपच्या विरोधात असलेल्यांनी गदारोळ केला. मात्र, आजचे गदारोळ करणारे विशिष्ट प्रकारचा मलम लावताच भाजपच्या दावणीला गेल्याचे गेल्या सहा महिन्यात पहावयास मिळाले आहे. मागील काही महिन्यात भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा चालवण्यासाठी काय केले. याबाबत असे काही वक्तव्य केले की त्यातून सकारात्मक अर्थ जाण्यापेक्षा नकारात्मक अर्थ काढण्याचेच काम केले. त्याच कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरु केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या शतकमहोत्सवानिमित्त आयोजित एका समारंभास चंद्रकांत पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावरून सत्तेच्या जोरावर कोणता गड कसा काबिज करायचा हे भाजपच्या नेत्यांना किंवा पदाधिकार्‍यांना सांगण्याची गरज नाही. हे करत असताना मात्र सरकारी यंत्रणा जणू काही दावणीला बांधल्याप्रमाणे काम करू लागल्याने सामान्य जनता भयभित झाल्याचे पहावयास मिळाले आहे. एका समारंभात तर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाली होती. त्या घटनेनंतर लोकांना समजले की चंद्रकांत पाटील हे दोन्ही डोळ्यांनी जगाला व्यवस्थित पाहू शकत नाहीत. मात्र, त्या घटनेनंतर ज्या माध्यमाच्या प्रतिनिधीने शाई फेकतानाचा व्हिडीओ बनवला त्याला तात्काळ माझ्यासमोर उभे करण्याचा फतवा काढला होता. एकंदरीत माध्यमांच्या प्रतिनिधींचा आणि आंदोलकांची ओळख सोडा पण संपर्कही नसतो. मात्र, सर्व घटना लोकांच्या पर्यंत पोहचवणारी माध्यमेच अशा घटना घडवून आणत असल्याचे आरोप मंत्री करू लागले आहेत. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात जिहे कठापूर योजनेचे काम पुर्ण होवून सुमारे दोन महिने झाले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच या योजनेचे उद्घाटन करण्यासाठी आणणार अशी चर्चा माण-खटावचे आमदार व माढ्याचे खासदार यांच्याकडून घडवून आणण्यात आली होती. या दौर्‍याची फक्त चर्चाच झाली. दौर्‍याच्या तयारीसाठी हातावरच्या फोडाप्रमाणे जपलेली पिके हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी हेलीपॅड बनवण्यासाठी जमिनदोस्त करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत इतर केंद्रिय मंत्री येणार असल्याने माण तालुक्यातील आंधळ धरण परिसरात 9 हॅलीपॅड बनविण्यात आली. याबाबतची तयारी जोरदार झाल्याचा अंदाज येताच राज्यसभेचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या घराण्याकडून पंतप्रधानांना पुरस्कार देण्याचेही घोषित केले. पंतप्रधान कार्यालयाने प्रारंभी 19 फेब्रवारी हा दिवस निश्‍चित केला. मात्र, त्याततही बदल होत गेला. अखेर पंतप्रधान कार्यालयाने पुणे-फलटण व्हाय आंधळी धरण असा पंतप्रधानांचा दौरा निश्‍चित करण्यास मान्यता दिली. अखेर त्यावरही माशी शिंकली अन पीएम आणण्याची घोषणा करणार्‍या आमदार-खासदारांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंधळी धरणाच्या जलपुजनाचा समारंभ उरकता ध्यावा लागला. धरणाच्या जलपूजनाचा मुहुर्त होता 12 वाजण्याचा मात्र खा. उदयनराजे भोसले यांच्याच वाड्यावर मुख्यमंत्री साडेबारा वाजेपर्यंत होते. अशा स्थितीत राजकारण्यांना जनतेच्या प्रश्‍नाशी घेणे-देणे आहे का? असा सवाल उपस्थित होवू लागला आहे.

COMMENTS