पारनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू ; अत्याचारानंतर खून केल्याचा संशय

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पारनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू ; अत्याचारानंतर खून केल्याचा संशय

अहमदनगर/प्रतिनिधी - पारनेर तालुक्यातील जवळे येथे बरशीले वस्तीवर 16 वर्षीय शाळकरी मुलीचा संशयास्पद मृतदेह तिच्या घरी आढळून आला आहे. गुरुवारी दुपारी 2

विखे-जगतापांना फाईट देणार आता लंके – काळे; एकमेकांना ताकद दिली जाणार, नगर दक्षिणेच्या राजकारणात येणार रंगत
माजी नगरसेवक छिंदमविरोधात दोषारोप पत्र दाखल होणार
निवडणुकीच्या अनुषंगाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी : अपर जिल्हाधिकारी कोळेकर

अहमदनगर/प्रतिनिधी – पारनेर तालुक्यातील जवळे येथे बरशीले वस्तीवर 16 वर्षीय शाळकरी मुलीचा संशयास्पद मृतदेह तिच्या घरी आढळून आला आहे. गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. यासंदर्भात मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार गेल्या काही वर्षापासून या मुलीचे आई-वडील जवळे येथे वास्तव्यास आहेत. मोलमजुरी करून ते आपला चरितार्थ चालवितात. नेहमीप्रमाणे मुलीचे आई-वडील सकाळी मोलमजुरीसाठी गेले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मुलीचा भाऊ क्लाससाठी निघून गेला. त्यानंतर या मुलीचा घातपात झाला असावा, अशी शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुलीच्या मृतदेहाजवळ एक कापडी बोळा आढळून आल्याचे सांगण्यात आले. दुपारी मुलीचा भाऊ घरी आल्यानंतर त्याच्या हा प्रकार लक्षात आला. त्याने बहिणीला हलवून उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्याने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक धावून आले. मुलीस खासगी रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

अत्याचार करून खून ?
मुलीच्या मृतदेहाजवळ एक चाकू तसेच टॉवेलच्या तुकड्याचा बोळा आढळून आल्याची माहिती पुढे आली असून चाकूचा धाक दाखवून तोंडात बोळा कोंबून मुलीवर अत्याचार करण्यात आला व त्यातच तिचा मृत्यू झाला असावा असेही सांगण्यात आले. मात्र, त्यास अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पोलिस याप्रकरणी तपास करीत आहे.

आरोपीला पकडण्याची मागणी
पारनेर तालुका शिवसेना महिला आघाडीच्यावतीने पारनेर पोलिसांना निवेदन देण्यात आले असून, जवळ्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणार्‍या आरोपींना तातडीने अटक करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तालुका महिला आघाडी प्रमुख प्रियांका खिलारी, महिला आघाडी शहर प्रमुख ललिता औटी, गणप्रमुख वर्षा खामकर यांच्यावतीने पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांना देण्यात आले. यावेळी डॉ. पद्मजा पठारे, प्राजक्ता गाडगे, अलका खामकर, प्रीती परांडे, रोहिणी औटी, विद्या खामकर, ताराबाई वारे, पूनम खोडदे, संगीता भोसले, प्रमिला पावरा, वंदना पावरा,हेमा खोडदे आदी उपस्थित होत्या.

COMMENTS