क्रीडाक्षेत्रासाठी सुवर्णकाळ…

Homeताज्या बातम्यासंपादकीय

क्रीडाक्षेत्रासाठी सुवर्णकाळ…

जगात सर्वाधिक लोकसंख्या असणार्‍या देशांमध्ये भारत दुसर्‍या क्रमाकांवर आहे. भारताची लोकसंख्या 131 कोटीच्या पुढे असून देखील भारताला पदक मिळत नाही, अशी

ऐतिहासिक करार
राजकारणातील गुन्हेगारीकरण
सत्ता सपंत्तीचा मोह…

जगात सर्वाधिक लोकसंख्या असणार्‍या देशांमध्ये भारत दुसर्‍या क्रमाकांवर आहे. भारताची लोकसंख्या 131 कोटीच्या पुढे असून देखील भारताला पदक मिळत नाही, अशी नेहमीच ओरड केली जायची. मात्र आजचा भारत बदलतांना दिसतोय. क्रीडाक्षेत्रात भारताला मोठया प्रमाणावर पदकं मिळतांना दिसून येत आहे. थोडक्यात आत्ताचा काळा हा क्रीडाक्षेत्रासाठी सुवर्णकाळच म्हणावा लागेल. क्रिकेटमध्ये तर भारताने मातब्बर टीमचा दबदबा मोडीत काढून आपला दबदबा निर्माण केला आहे. याचबरोबर इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने पदकांची लयलूट करतांना, आपली महत्वाकांक्षा वाढवली आहे. या स्पर्धांमध्ये वेटलिफ्टिंगमधील प्रकारात भारताने सहावे पदक जिंकत पुन्हा एकदा आपला दबदबा निर्माण केला आहे. स्पर्धा संपेपर्यंत भारताच्या खात्यात मोठया प्रमाणावर पदके जमा झालेली असतील, यात शंका नाही. भारतीय वेटलिफ्टर अचिंता शिउली बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने तिसरे सुवर्णपदक जिंकले आहे. यासह भारताने सहावे पदक जिंकले आहे. मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. बिंदियारानी देवीने महिलांच्या 55 किलो वजनी गटात आणि संकेत सरगरने पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. गुरुराजा पुजारीने पुरुषांच्या वेटलिफ्टिंग 61 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. यानंतर भारताचा युवा सेन्सेशन जेरेमी लालरिनुंगा याने 67 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला. कॉमनवेल्थ गेम्सच्या इतिहासातील वेटलिफ्टिंगमधील भारताचे हे 131 वे पदक आहे. भारतापेक्षा फक्त ऑस्ट्रेलियाने जास्त पदके जिंकली आहेत. तसेच स्पर्धा अजूनही सुरु असल्यामुळे या पदकांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण भारतात आता क्रीडा क्षेत्रासाठी अत्याधुनिक सोयी-सुविधा आणि योग्य प्रशिक्षक आणि मार्गदर्शक मिळत असल्यामुळे पदकांची अपेक्षा वाढली आहे. देशात क्रीडाक्षेत्राबद्दल करिअर म्हणून विचार होवू लागला आहे. त्यामुळे भारतात आजचा काळ हा क्रीडाक्षेत्रासाठी सुवर्णकाळ आहे, असेच म्हणावे लागेल. आजचा काळ हा जरी क्रीडाक्षेत्रासाठी सुवर्णकाळ असला, तरी ही झेप येथेच थांबवता कामा नये. क्रीडाक्षेत्रात आमुलाग्र सुधारणा करण्याबरोबरच निधीची तरतूद देखील मोठया प्रमाणावर करण्याची गरज आहे. ग्रामीण भागात गुणवत्ता ठासून भरलेली आहे. फक्त त्या गुणवत्तेची कदर व्हायला हवी. त्यांना योग्य त्या सोयशी सुविधा मिळाल्या, तर ते जीवतोड मेहनत करून देशाचे नाव नक्कीच उंचावू शकतात.राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या पदकतालिकेत प्रथम क्रमांकावर ऑस्ट्रेलिया, दुसर्‍या क्रमांकावर भारत आहे. त्यामुळे भारताने इतर देशांची मक्तेदारी मोडीत काढण्याच्या दिशेने वाटचाल केल्याचे यावरून दिसून येत आहे. क्रिकेट सारख्या खेळाला आपण डोक्यावर घेऊन नाचतो, मात्र इतर खेळाकडे प्रामुख्याने लक्ष देत नाही. त्याचा परिणाम खेळाडूंवर देखील होत असतो. आपल्या खेळाला जर वलय नसेल, तर प्रोत्साहन भेटत नसल्याची भावना खेळाडूमध्ये निर्माण होते. त्यामुळे सर्वच क्रीडाप्रकारांना समान संधी देत, चांगल्या खेळाडूंचा शोध घेण्याची गरज आहे. त्यामुळे येणार्‍या काळात क्रीडाक्षेत्रांचा आलेख चढता ठेवण्यासाठी सकारात्मक योजनांची गरज असून, ग्रामीण क्षेत्राला बुध्दीमत्तेला पुढे आणण्याची गरज होती. क्रीडा विद्यापीठ वाढवण्याची गरज असून, क्रीडा क्षेत्रात आपले करिअर करू इच्छिणार्‍या तरुणांना संधी मिळण्याची खरी गरज आहे. गेल्या वर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताने 100 पेक्षा अधिक पदकांची लयलूट केली होती. हा सिलसिला असाच सुरु राहण्याची शक्यता यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत देखील पहायला मिळू शकते.

COMMENTS