Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांचा पिक विमा कडा कृषी उत्पन्न बाजार समिती एक रुपया न घेता भरून घेणार-आ.सुरेश धस

आष्टी प्रतिनिधी - मराठवाड्यातील एकमेव कडा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक बिनविरोध झाली.  यामध्ये आ.बाळासाहेब आजबे,मा.आ.साहेबराव दरेकर,मा.आ.भिम

मेहता कन्या विद्यालयात शालेय गणित विज्ञान प्रदर्शन उत्साहात
अंगणवाडी सेविकांचा विविध मागण्यासाठी बालविकास प्रकल्पवर मोर्चा
जि.प., लातूर पं. स. च्या मुल्यांकनाची तपासणी

आष्टी प्रतिनिधी – मराठवाड्यातील एकमेव कडा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक बिनविरोध झाली.  यामध्ये आ.बाळासाहेब आजबे,मा.आ.साहेबराव दरेकर,मा.आ.भिमराव धोंडे सर्वांचे श्रेय आहे.कडा कृषी उत्पन्न बाजार समितीत लालसगांव नंतर सर्वात मोठे कांदा मार्केट असून या मार्केट मध्ये कांदा विकलेल्या शेतकर्‍यांना कांदा अनुदान 21 कोटी 32 लाख 58 हजार रुपये शेतकर्‍यांना 15 ऑगस्ट पर्यंत मिळणार असून भाजपच्या काळात 3 वेळा अनुदान भाजप – शिवसेना काळात मिळाले मधील 32 महिन्यात काहीच मिळाले नाही,अतिवृष्टी अनुदान देखील मिळाले आहे.शेतक-यांनी नियमित कर्ज भरले त्यांना 50 हजार 50 टक्के लोकांना मिळायचे राहिलेत उर्वरित शेतकर्‍यांना तात्काळ मिळण्यासाठी प्रयत्न करणार असून सर्वांनी आभा कार्ड काढून घ्यावे राज्य सरकार पीएम किसान चे आणखी 6 हजार वाढवले,महिलांना बसमध्ये सवलत दिली सरकारने चांगले निर्णय घेतले,सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,संचालक यांचे आरोग्य विमा,अपघात विमा बाजार समिती काढणार असून शेतकर्‍यांचा पिका विमा बाजार समिती भरणार असल्याचे आ.सुरेश धस यांनी सांगितले ते तालुक्यातील सर्व शेतकरी,व्यापारी,ग्रां.पं.सदस्य, सोसायटी सदस्य,मतदार यांच्या भव्य मेळाव्यात बोलत होते.या मेळाव्याचे आयोजन सभापती , उपसभापती,सर्व संचालक मंडळ,कृषी उत्पन्न बाजार समिती कडा यांच्या वतीने आ.सुरेश धस यांच्या सुचनेनुसार भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.मोठ्या प्रमाणावर शेतकरी,व्यापारी,मतदारांनी अलोट गर्दी केली होती यावेळी व्यासपीठावर आ.सुरेश धस,युवा नेते जयदत्त धस,कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णू चव्हाण,सभापती रमजान तांबोळी,बद्रीनाथ जगताप,मा.उपसभापती आदिनाथ सानप,संजय आजबे,छत्रगुण मरकड,संजय ढोबळे,राजेंद्र दहातोंडे,लक्ष्मण ननवरे,अनिल ढोबळे,परिवंत गायकवाड,राम शेठ मधुरकर, ड रिजवान शेख,दत्तात्रय खोटे,भगवान सांगळे,पोपट बनसोडे,संदीप खाकाळ,सरपंच सौ.वंदना परिवंत गायकवाड,मनिषा थोरवे आदी उपस्थित होते.यावेळी अध्यक्ष विष्णू चव्हाण म्हणाले की आ.सुरेश धस हाच आमचा पक्ष आणि तेच आमचे नेते,सभापती रमजान तांबोळी यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की शेतकर्‍यांच्या सेवेसाठी कडा कृषी उत्पन्न बाजार समिती तत्पर राहिल आपला कांदा परराज्यात कड्याचे नावानं विकतो अण्णांच्या सहकार्याने मला दुस-यांदा सभापती पदाची संधी मिळाली 25 वर्षांपासून आ.सुरेश धस यांच्या ताब्यात बाजार समिती असून मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे.संतोष मुटकुळे,राम धुमाळ,अजित घुले,महेश खाकाळ,रेवन्नाथ राऊत,शेतकरी,व्यापारी,ग्रां.पं.सदस्य,सोसायटी सदस्य,मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रस्ताविक हिरालाल बलदोटा, सुत्रसंचलन सिद्धेश्वर शेंडगे यांनी केले.

COMMENTS