क्रिप्टोकरन्सी संदर्भात लवकरच विधेयक : सीतारामण

Homeताज्या बातम्यादेश

क्रिप्टोकरन्सी संदर्भात लवकरच विधेयक : सीतारामण

नवी दिल्ली : क्रिप्टोकरन्सी हे एक जोखमी असलेले क्षेत्र असून, याचे नियमन आणि जागरूकता वाढविण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बाजार नियामक मार्फत जाग

संपूर्ण जामखेडमध्ये एकही पाणपोई नाही..!
कृत्रिम पावसाच्या प्रयत्नात, दुब‌ईत ढगफुटीने महापूर!
बिपीन रावत यांच्या अपघाताला खराब हवामान कारणीभूत

नवी दिल्ली : क्रिप्टोकरन्सी हे एक जोखमी असलेले क्षेत्र असून, याचे नियमन आणि जागरूकता वाढविण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बाजार नियामक मार्फत जागरूकता करण्यात येत आहे. तसेच क्रिप्टोकरन्सी संदर्भातील विधेयक लवकरच आणले जाणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी राज्यसभेत दिली.
क्रिप्टोकरन्सीच्या जाहिरातींवर बंदी घालण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याशिवाय सरकार याबाबत लवकरच विधेयक आणणार असल्याचे त्या म्हणाल्या. नवीन विधेयकावर काम केले जात असून ते लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडले जाईल, असे त्यांनी राज्यसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासात सांगितले. त्या म्हणाल्या की, गेल्या वेळी क्रिप्टोकरन्सीवर एक विधेयक प्रस्तावित करण्यात आले होते, परंतु आता आम्ही नवीन विधेयकावर काम सुरू केले असून मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यावर ते सभागृहात सादर केले जाईल असे त्या म्हणाल्या. खासगी क्रिप्टोकरन्सीला चाप लावण्यासाठी केंद्र सरकार आणणार विधेयककेंद्र सरकारने देशातील खासगी क्रिप्टोकरन्सीतून चालणार्‍या व्यवहारांना चाप लावण्यासाठी पुढाकार घेतला असून लवकरच त्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून डिजिटल करन्सी जारी करण्यात येईल. जाहिरातींवर अंकुश ठेवण्यासाठी उचललेल्या उपाययोजनाबद्दल विचारण्यात आलेल्या खासदार सुशील कुमार यांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना सीतारमण म्हणाल्या की, क्रिप्टोकरन्सीच्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी अद्याप कोणतीही पावले उचलली गेलेली नाहीत, परंतु गुंतवणूकदारांना सावध केले गेले आहे.

COMMENTS