Homeताज्या बातम्यामनोरंजन

जिनिलिया-रितेश तिसऱ्यांदा आई-बाबा होणार?

मुंबई प्रतिनिधी - बॉलिवूड आणि मराठी मनोरंजन विश्वात नेहमीच चर्चेत असणारं कपल म्हणजे अभिनेत्री जिनिलिया देशमुख आणि रितेश देशमुख. या जोडीचा एक म

पवार व गडकरी म्हणजे देशाचे चमकते तारे : राज्यपाल कोश्यारींनी केला गौरव
टीम इंडियाला प्रचंड मोठा धक्का। LokNews24
भांडुपमध्ये स्लॅब कोसळून चिमुरड्याचा मृत्यू

मुंबई प्रतिनिधी – बॉलिवूड आणि मराठी मनोरंजन विश्वात नेहमीच चर्चेत असणारं कपल म्हणजे अभिनेत्री जिनिलिया देशमुख आणि रितेश देशमुख. या जोडीचा एक मोठा चाहतावर्ग देशभरात आहे. अलीकडेच रितेश-जिनिलियाने ‘वेड’ या सिनेमाद्वारे मराठीमध्ये एकत्र काम केले. मुख्य अभिनेत्री म्हणून जिनिलियाचा हा पहिलाच मराठी सिनेमा होता, तर रितेशने दिग्दर्शनाची धुरा सांभाळलेला हा पहिला सिनेमा होता. दरम्यान बॉक्स ऑफिसवर वेडने कमाल केली, आजही या सिनेमाची आणि त्यातील रितेश-जिनिलियाच्या जोडीची चर्चा होते. शिवाय ते इन्स्टाग्रामवर विशेष सक्रिय असल्याने त्यांचे रील व्हिडिओ नेहमीच व्हायरल होत राहतात. मात्र अलीकडेच मुंबईत एका इव्हेंटमध्ये स्पॉट झालेले रितेश-जिनिलिया एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. या व्हिडिओनंतर जिनिलिया तिसऱ्यांदा आई होणार आहे का, असा सवाल नेटकरी विचारत आहेत.अलीकडेच मुंबईतील एका फॅशन स्टोअरच्या लाँचसाठी हे कपल पोहोचले होते. एकमेकांच्या हातात हात पकडून दोघांनी एन्ट्री केली आणि पापाराझींसमोर पोजही दिल्या. या इव्हेंटसाठी जिनिलियाने जांभळ्या रंगाचा वनपीस परिधान केला होता, तर रितेश पांढरा शर्ट आणि आकाशी पँट अशा लूकमध्ये दिसला. यावेळी जिनिलियाच्या एका कृतीमुळे अनेकांचे लक्ष तिच्या पोटाकडे वेधले जात होते. या व्हिडिओत जिनिलिया तिच्यावर पोटावर हात ठेवताना जिनिलियाच्या एका कृतीमुळे अनेकांचे लक्ष तिच्या पोटाकडे वेधले जात होते. या व्हिडिओत जिनिलिया तिच्यावर पोटावर हात ठेवताना दिसली. जिनिलियाने परिधान केलेल्या ड्रेसमध्ये तिचं ब्लोटिंग टमी दिसत असून, यामुळे युजर्सना प्रश्न पडला की ती पुन्हा एकदा आई होणार आहे की काय? जिनिलिया-रितेशचा विरल भयानीने शेअर केलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर कमेंटचा पाऊस पडला आहे. ‘ती प्रेग्नंट आहे का?’, ‘पुन्हा एकदा प्रेग्नंट?’ ‘गुड न्यूज मिळणार आहे का?’ असे सवाल अनेक युजर्सनी विचारले आहेत. दरम्यान रितेश आणि जिनिलिया यांना रियान आणि राहील नावाची दोन मुलं आहेत. रितेश- जिनिलियाची भेट ‘तुझे मेरी कसम’ या सिनेमाच्या सेटवर झाली होती. जवळपास १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर २ फेब्रुवारी २०१२ रोजी त्यांनी लग्न केले. लग्नानंतर २ वर्षांनी २४ नोव्हेंबर २०१४ रोजी त्यांनी त्यांचे पहिले अपत्य रियानला जन्म दिला. तर त्यांनी १ जुन २०१६ रोजी राहीलचे स्वागत केले.

COMMENTS