Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महामानवांचा अवमानप्रकरणी जामखेडकरांनी पाळला बंद

राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेड, बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी सहभागी

जामखेड प्रतिनिधी - भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी उच्च व तंत्र

कुणी घेतेय आ. लंकेंची..तर कुणी देवरेंची बाजू; पारनेरच्या वादाचे राज्यभरात उमटले पडसाद
जामखेडमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे
स्व. विठ्ठलराव भैलुमे यांना कर्जतमध्ये जयंतीनिमित्त अभिवादन

जामखेड प्रतिनिधी – भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विषयी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अवमानजनक वक्तव्य केले. त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ रविवारी 11 डिसेंबर रोजी पुकारलेल्या जामखेड बंदला छोट्या मोठ्या सर्व दूकानदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा उच्च शिक्षणमंत्री चंद्रकात पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा भिमसैनिकांनी 9 रोजी सायंकाळी खर्डा चौकात चंद्रकात पाटील यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 10 डिसें रोजी सकाळी 11:30 वाजता शहरातील खर्डा चौकात निषेध सभा व जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तसेच 11 जामखेड बंद पूकारण्यात आला होता.या बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी, संभाजी ब्रिगेड, बौद्ध महासभा, समस्त भिमसैनिक, वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने या बंदला पाठिंबा देण्यात आला होता .


निषेध व्यक्त करण्यासाठी बंद हाच एकमेव पर्याय का?- महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे महाराष्ट्राच्या जडण-घडणीत आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदान वादातीत आहे. या महामानवांचा अवमान केल्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट उमटली. यानिमित्ताने विविध जिल्ह्यात आंदोलने करून बंद पाळण्यात आला. मात्र महापुरुषांचा अवमान केल्यानंतर बंद हा पर्याय ठरू शकतो. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होते, अनेकांना वेठीस धरले जाते. त्याऐवजी यावर कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्याची खरी गरज आहे. कोणत्याही घटनेत निषेध करण्यासाठी, कारवाईची मागणीसाठी निवेदन द्या, प्रशासनाच्या, शासनाच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलने, उपोषणे करा. आत्मक्लेश करा. मात्र उठसूठ गाव बंद करणे बरोबर नाही. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणारे काही लोक समस्त समाजाचे स्वयंघोषित ठेकेदार होऊन बसले आहेत. व्यवसायिक छोटा असो की मोठा, मजुरी करणारे असो की नोकरी, सर्व सामान्य माणूस यांना कधीही बंदबाबत विश्‍वासात घेतले जात नाही. समाजाच्या प्रत्येक घटकातील प्रत्येक व्यक्तीला भावना आहेत. तेही अशा गोष्टींचा निषेध करतात.तसेच बंद पुकारणारयांचाही मनापासून ते निषेध करतात. हे राजकीय लोकांच्या लक्षात येत नाही. काही घटनांमध्ये राजकीय सामाजिक श्रेयासाठी, आडवाआडवी करण्यासाठीही असे फंडे वापरले जातात. मात्र हातावर पोट असणारे मजुर लोक, शाळेतील मूलं, प्रवासी, सामान्य माणूस बंदमुळे वेठीस धरले जातात. हे बरोबर नाही.विश्‍वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानने दिलेल्या मौलीक आधिकाराचा सर्रास अतिरेक होतांना दिसत आहे. उठसूठ गाव बंद पुकारून आपल्यामुळे इतरांच्या जगण्यावर गदा येऊ नये याचा विचार सर्वांत आधी राजकारण्यांनी करण्याची गरज आहे.

COMMENTS