Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उर्दू शाळेत पालकमंत्र्यांनी दिलेल्या निधीत अपहार; उर्दू हायस्कूल बचाव कृती समितीचा आरोप

इस्लामपूर / प्रतिनिधी : एच एम एस उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. आबेदा कोतकुंडे यांनी शहरातील तथाकथित स्वयंघोषित अध्यक्ष म्हणून मिरवणारे सै

आंघोळी करताना विजेचा धक्का बसून बालकाचा मृत्यू
विमानांच्या आवाजाने बंकरमध्ये जीव मुठीत : सौरभ जाधव याचा थरारक अनुभव
सीमा प्रश्‍नाबाबत सर्वोच्च न्यायालयात मांडण्याच्या भूमिकेबाबत सविस्तर चर्चा : ना. शंभूराज देसाई

इस्लामपूर / प्रतिनिधी : एच एम एस उर्दू हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. आबेदा कोतकुंडे यांनी शहरातील तथाकथित स्वयंघोषित अध्यक्ष म्हणून मिरवणारे सैफ मुल्ला व सचिव मीनाज दिवाण यांना हाताशी धरून इस्लामपूर अर्बन बँकेतील खाते पुन्हा कार्यरत करून पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिलेल्या निधीत अपहार केला असल्याचे आरोप हजरत मोहब्बत सुलेमान उर्दू हायस्कूल बचाव कृती समितीचे सुफीसाहेब मोमीन यांनी पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. निवेदनात म्हटले आहे की, साधारण 80 वर्षांपूर्वी इस्लामपूर शहरातील मुस्लिम समाजातील लोकांनी एकत्रित येऊन इस्लामपूर एज्युकेशन सोसायटी या नावे शैक्षणिक संस्था सुरू केली. त्या मार्फत एच एम एस उर्दू हायस्कूल या नावे हायस्कूल सुरू केले. सद्यस्थितीला इस्लामपूर एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ मयत आहेत. या संचालक मंडळचा वाद चॅरिटी कमिशन सांगली व कोल्हापूर येथे सुरू आहे. अद्यापपर्यंत न्याय प्रविष्ठ आहे. सध्या एचएमएस उर्दू हायस्कूलचा कारभार मुख्याध्यापिका सौ. आबेदा कोतकुंडे ह्या पाहत आहेत. संचालक मंडळ अस्तित्वात येईपर्यंत त्याच या एज्युकेशन सोसायटीच्या कायदेशीररीत्या कर्त्याधर्त्या आहेत. या हायस्कूलची दशा पाहता इस्लामपूर शहरातील व आसपासच्या भागातील मुस्लिम समाजातील मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण मिळण्याच्या मानस करून माजी पालकमंत्री जयंत पाटील यांनी या संस्थेस 50 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला होता. या हायस्कूलचे बँक खाते इस्लामपूर अर्बन बँक इस्लामपूर व बँक ऑफ इंडिया इस्लामपूर येथे होते. परंतू या संस्थेच्या संचालक मंडळाबाबतचा खटला न्यायप्रविष्ठ असल्याने संबंधित बँक खाते गोठवले होते. मुख्याध्यापिका सौ. आबेदा कोतकुंडे यांनी शहरातील तथाकथित स्वयंघोषित अध्यक्ष म्हणून मिरवणारे सैफ मुल्ला व सचिव मीनाज दिवाण यांना हाताशी धरून इस्लामपूर अर्बन बँकेतील खाते पुन्हा कार्यरत करून सदर पूर्ण रकमेचा अपहार केला आहे. त्यांचे हे कृत्य समाज विघातक असून आ. जयंत पाटील यांचा विश्‍वासघात करणारा आहे. तरी संबंधिताविरोधात तत्काळ कायदेशीर कारवाई करून समाजास न्याय मिळवून द्यावा. हे निवेदन जिल्हा शिक्षण अधिकारी सुभाष चौगुले व सांगली जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम यांना देण्यात आले आहे. निवेदनावर हजरत मोहब्बत सुलेमान उर्दू हायस्कूल बचाव कृती समितीचे सुफीसाहेब मोमीन, अहमद इबुशे, माजीद इबुशे, शाकीर तांबोळी, अ‍ॅड. जमीर खानजादे, शकील गोलंदाज, इब्राहिम मुजावर, रफिक किणीकर, मोहसीन पटवेकर, फारूक इबुशे, बरकत सावकार, जावेद इबुशे, सिकंदर मोमीन यांच्या सह्या आहेत.

COMMENTS