Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव तहसील कार्यालयात 6 लाखाचा अपहार

अनेक बीएलओ लाभार्थी एकाच कुटुंबांतील

कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुक्यातील पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमांतर्गत देय असलेल्या मानधन रक्कम कोपरगाव तहसील कार्यालयातील ए

आमदार राम सातपुते यांनी दाखवले माणुसकीचे दर्शन..!
..पुन्हा असे केले तर ख़बरदार…; भाजपने दिला शिवसेनेला इशारा
विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी वाणिज्य मंडळाची गरज ः  प्राचार्य डॉ. भोर

कोपरगाव तालुका ः कोपरगाव तालुक्यातील पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या कार्यक्रमांतर्गत देय असलेल्या मानधन रक्कम कोपरगाव तहसील कार्यालयातील एका अधिकार्‍याने वरिष्ठांच्या संगनमताने तब्बल सहा लाख रुपयांचा भष्टाचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. माहिती अधिकार आणि सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी माहितीच्या अधिकार अंतर्गत मागितलेल्या माहितीद्वारे हा घोटाळा उघडकीस आला आहे. याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मागील वर्षी 25 फेबु्रवारी 2023 निवडणूक कार्यक्रम (12)(2) 188/2023 च्या अनुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशानुसार कोपरगाव तालुक्यातील मतदान केंद्र स्तरीय अधिकारी (बीएलओ) 25 पर्यवेक्षक यांच्या दोन वर्षाच्या मानधनासाठी 24 हजार रुपये प्रत्येकी प्रमाणे एकूण 6 लाख रुपये निधी कोपरगाव तहसीलदर यांच्या नावे प्राप्त झाला होता. 26 जून 2023 रोजी कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी आरटीजीएसद्वारे वरील लाभार्थ्यांच्या खात्यावर पाठवलाही. येथपर्यंत हे प्रकरण ठीक वाटते. मात्र येथूनच खर्‍या गोंधळाला सुरवात होते. वरील उल्लेख केलेले सर्व बीएलओ यांची यादी तहसील कार्यालयातील राहुल साहेबराव शिरसाठ या तत्कालीन महसूल अधिकारी आणि निवडणूक संकलक या अधिकार्‍याने तयार केलेली होती. या यादीचे वैशिष्ठे म्हणजे यातील बरेच बीएलओ लाभार्थी हे एकाच कुटुंबातील आहेत. तर एकाच लाभार्थ्याच्या खात्यावर 2-3 वेळा 24 हजार रुपयांच्या रकमा जमा झालेल्या आहेत. काही बीएलओ लाभार्थी गृहिणी आहेत. तर एक बीएलओ लाभार्थी चक्क महिला पोलिस कर्मचारी आहे. पोलिस कर्मचार्‍यांना शासकीय कामासाठी दोनदा मोबदला कधीपासून मिळायला सुरवात झाली आहे हे आता ती लाभार्थी महिला पोलीस कर्मचारी किंवा वरील भ्रष्टाचारीच सांगू शकतील.

वरील भ्रष्टाचाराचा संशय सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांना आल्यानंतर त्यांनी याबाबत 5 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे लेखी तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी शिर्डी उपविभागीय अधिकारी यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यावर उपविभागीय अधिकार्‍यांनी02 फेबु्रवारी 2024 रोजी आपला आपला चौकशी अहवाल जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला असून आज अखेर त्यावर वरील कोणत्याही विभाकडून काहीही कारवाई करण्यात आली नाही. वरील अहवालात राहुल साहेबराव शिरसाट या महसूल कर्मचार्‍यावर निलंबनाची शिफारीस केलेली आहे. तर तहसीलदार संदीपकुमार भोसले आणि नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांनी महाराष्ट्र नागरी सेवा(वर्तणूक) नियम 1979 चे नियम 3 मधील तरतुदीचा भंग केल्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) 1979 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याची शिफारस शिर्डी उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या अहवालात केली आहे. वरीलप्रमाणे एकाच प्रकारचे काही नावे, तीच तीच नावे 2-3 वेळा यादीमध्ये येतात तरीही तहसीलदार कोणताही आक्षेप न घेता त्यांची बिले डोळे झाकून मंजूर करतात. यातच बरेच काही हितसंबंध सामावलेले दिसून येत आहे.

गुन्हा दाखल ; इतर आरोपींवर कारवाई कधी  ? – या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यामध्ये नायब तहसीलदार विलास भांबरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नो. क्र.138/2024 भा.द .वी 409, 420, 468, 471 प्रमाणे राहुल साहेबराव शिरसाठ, महसूल सहायक कोपरगाव जिल्हा अहमदनगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा घडल्याचा कालावधी 21 जून 2023 ते 26 जून 2023 असा नमूद करण्यात आला आहे. पुढील तपास स. पो. नि. मयूर भामरे हे करीत आहे. याप्रकरणातील आरोपीने प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येताच अपहार केलेली 6 लाख रुपयांची रक्कम कोषागारात परत जमा केली आहे. तसेच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणातील इतर आरोपींवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. इतर प्रकरणात तत्परतेने कारवाई होत असते. मात्र यातील इतर आरोपी शासकीय नोकर असल्या कारणाने त्यांना कारवाई पासून सवलत मिळाली कि काय असा सवाल सर्व सामान्यांना पडला आहे

COMMENTS