Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिंदे-फडणवीस सरकारने कामांना स्थगिती देऊन काय मिळवले

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा सवाल

श्रीगोंदा प्रतिनिधी : राजकारणाचा पोत खाली घसरत चालला असून, शिंदे -फडणवीस सरकारने विकास कामांना स्थगिती देऊन काय मिळवले असा सवाल विरोधी पक्षेनेते

अजित पवारांनी आपल्या काकासोबत गद्दारी करून शपथ घेतली त्यावेळी त्यांनी नारेबाजी का केली नाही ?
इथेनॉल बंदी उठवण्यासाठी केंद्रासोबत चर्चा करू
आमच्यात फाटले, उगीच शंका ठेवू नका

श्रीगोंदा प्रतिनिधी : राजकारणाचा पोत खाली घसरत चालला असून, शिंदे -फडणवीस सरकारने विकास कामांना स्थगिती देऊन काय मिळवले असा सवाल विरोधी पक्षेनेते अजित पवार यांनी श्रीगोंद्यात केला. पिंपळगाव पिसा येथील प्रागंणामध्ये भविष्याचा विचार राष्ट्रवादीचा संवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार राहुल दादा जगताप उपस्थित होते.


     अजित पवार यांनी आपल्या शैलीमध्ये शिंदे फडणवीस सरकारवरती घणाघाती टीका केली. महाविकास आघाडी सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी मंजूर केलेल्या कामांना शिंदे फडणवीस सरकारने ती कामे बंद केली स्थगिती दिली, असे गलिच्छ राजकारण यापूर्वी यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, विलासराव देशमुख, बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्रजी पवार, यांनी विकासाच्या बाबतीत कधीही राजकारण केले नाही. परंतु शिंदे-फडणवीस सरकारने कामे बंद करुन काय साध्य केले.  श्रीगोंदा तालुक्याच्या विकासाबद्दल अजित पवारांनी तर कपाळालाच हात लावला. तालुक्यामधील रस्त्याची दुरावस्था खूप दयनीय आहे रस्त्यात खड्डे का खड्यात रस्ते असा संतप्त टोलाही त्यांनी तालुक्याच्या आमदार बबनराव पाचपुते यांना लावला. शिंदे सरकार गुवाहाटीला जाऊन रेडे कापतात अंधश्रद्धेला खतपाणी घालतात. शिंदे-फडणवीस सरकार सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करतात जितेंद्र आव्हाड यांच्यावरती खोटे गुन्हे टाकले संजय राऊत यांना बेकायदेशीर रित्या अटक केली असे मत न्यायालयानी ही व्यक्त केले तसेच सीमा वादावरी मोठा वादंग चालू असताना शिंदे फडणवीस सरकार गप्प का आहे. असाही संतप्त सवाल करत अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकार वरती जोरदार सडकून टीका केली.


       यावेळी श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार राहुल जगताप बोलताना म्हणाले श्रीगोंदा तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी तालुक्याच्या प्रश्‍नावर बोलणे टाळण्यासाठी आजारपणाचे सोंग आणले आहे. इतर कार्यक्रमांमध्ये 25 मिनिटे बोलतात पण तालुक्याचा फुटलेला विकासावरती बोलायचे गेलं तर आजारपणाचे सोंग आणतात. नेहमी तालुक्याच्या राजकारणामध्ये फोडाफोडीचे राजकारण केले. मात्र आत्ता त्यांच्याच कुटुंबामध्ये दुफळी निर्माण झाली आहे, अशी टीका जगताप यांनी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष घनःश्याम आण्णा शेलार, महाराष्ट्र राज्य बाजार समिती अध्यक्ष बाळासाहेब नाहटा, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हरिदास आबा शिर्के, माजी पंचायत समिती सदस्य कल्याण ताई लोखंडे, संभाजीराजे दिवेकर, आबा पाटील पवार,शरद नवले, भाऊसाहेब खेतमाळीस, विजय शेंडे,कुकडी कारखान्याचे संचालक, सभासद, श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी वर्ग, कार्यकर्ते  मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.प्रस्ताविक हरिदास शिर्के यांनी केले तर आभार कारखान्यांचे व्हा.चेअरमन यांनी व्यक्त केले.


भाजपने जणू महापुरुषांचा अवमान करण्याचा विडाच उचलला – भाजपच्या सरकारने महापुरुषांचा अवमान करण्याचा जणुकाही विडाच उचलला आहे. राज्यपालसारख्या महत्त्वाच्या पदावर असणारा व्यक्ती खालच्या पातळीवर भाष्य करतात महापुरुषांचा अवमान करतात हे अशोभनीय आहे. पुण्याचे पालक मंत्र्यांनी तर कळसच केला आहे त्यांना जनाची नाही तर मनाची तरी वाटली पाहिजे अशा भाषेमध्ये अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांचा ही चांगला समाचार घेतला. भाजपकडून होणार्‍या महापुरुषांचा व महाराष्ट्राच्या आस्मस्तीचा तापमान व भाजपचे नेत्यांचे बेलगाम वक्तव्याचे विरोधात, व राज्यपाल हटाव या विरोधात 17 डिसेंबर रोजी मुंबई मध्ये भव्य असे आंदोलन राष्ट्रवादी करणार आहे त्यावेळी सर्वांनी या आंदोलनांमध्ये भाग घ्यावा असेही आव्हान यावेळी अजित पवार यांनी केले

COMMENTS