Homeताज्या बातम्यासंपादकीय

मनुवादी पवार ते पेरियारवादी स्टॅलिन : एक फरक ! 

 असं म्हणतात की, इतिहास पोकळी कधीच ठेवत नाही. उत्तर भारतात सुरू असलेले मनुवादी व्यवस्थेचे आक्रमण थोपविण्यात स्वतःला फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची परखडता ! 
उचलली जीभ, लावली टाळ्याला!
ट्रक ड्रायव्हर रस्त्यावर! 

 असं म्हणतात की, इतिहास पोकळी कधीच ठेवत नाही. उत्तर भारतात सुरू असलेले मनुवादी व्यवस्थेचे आक्रमण थोपविण्यात स्वतःला फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे वाहक सांगणारे देशाच्या राजकारणातील वरिष्ठ राजकीय नेते असलेल्या शरद पवार यांनी गेल्या दोन दिवसांत ज्या पध्दतीने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या  त्यावरून पुरोगामी म्हणविणारे हे नेते सामाजिक पातळीवर किती अपरिपक्व आहेत, ही बाब तिकडे दक्षिणेतील दोन मुख्यमंत्र्यांनी एकत्र येत सुरू केलेल्या ” वायकॅम सत्याग्रहा’च्या शतकी वर्षानिमित्त दिसून आला. तामिळनाडू चे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि केरळ चे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या एकत्र येण्यातून दिसते. वायकोम सत्याग्रह आंदोलन मंदिराच्या रस्त्यावरून चालण्याच्या अधिकारासाठी शूद्र म्हणजे आजच्या ओबीसी म्हणविल्या जाणाऱ्या समाजाने केले होते.  ” त्याला १०० वर्षे होत आहेत. त्यासाठी आजपासून पुढील तब्बल ६०३ दिवस चालणारे सामाजिक न्याय आणि पुनरुत्थान कार्यक्रमाचे शनिवारी केरळमधील कोट्टायम येथे उद्घाटन झाले. याप्रसंगी तामिळनाडू आणि केरळ अशा दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. यावेळी बोलताना तामिळनाडू चे मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले की, “स्वाभिमान, विवेकवाद, मानवतावाद, रक्त किंवा लिंगावर आधारित भेदभाव न करणे, आत्म-विकास, महिला सक्षमीकरण, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्ष राजकारण आणि वैज्ञानिक स्वभाव”. “हे सर्व एकाच वेळी सार्वत्रिक आदर्श आहेत आणि आपण ते तरुण पिढीपर्यंत नेण्याची वेळ आली आहे,” असे त्यांनी यावेळी  अधोरेखित केले. पेरियार यांचा लढा आता तरूणांमध्ये रूजविण्याची गरज आहे. शंभर वर्षापूर्वी केरळात स्वातंत्र्य आंदोलन आणि सामाजिक न्यायाचे आंदोलन हातात हात घालून वाटचाल करत होते. त्याला “वायकोम सत्याग्रह आंदोलन” म्हणतात हे आंदोलन जितके दिवस चालले आणि यशस्वी झाले त्यासाठी ६०३ दिवस लागले होते. त्याचे जागरण आणि पुनरुत्थान म्हणून हे शतक महोत्सवी आयोजन करण्यात आल्याचेही मुख्यमंत्री द्वयांनी यावेळी जाणीवपूर्वक सांगितले.  यावेळी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी देखील आपले विचार मांडताना स्पष्ट म्हणतात की, वैकोम सत्याग्रहाप्रमाणे समता आणि सामाजिक न्यायाच्या आदर्शांमध्ये रुजलेल्या पुरोगामी, सुधारणावादी लढ्यांमध्ये हे सार्वत्रिक आदर्श कसे होते हे पुढच्या पिढीला  सांगितले पाहिजे. ते (धर्मनिरपेक्ष आदर्श) फेटाळून आपल्या राष्ट्राचे धर्माधिष्ठित राष्ट्रात रूपांतर करण्याचे प्रयत्न करीत आहेत. मनुस्मृतीची ओळख करून देण्याच्या हालचाली आहेत. ज्याची जाणीव करून देणे केवळ सामाजिक अन्यायाचे पुनरुज्जीवन करण्यास मदत करेल. “आम्ही येथे अशा वेळी एकत्र आलो आहोत जेव्हा आमचे स्वातंत्र्य आणि घटनात्मक अधिकार मोठ्या आव्हानांना तोंड देत आहेत. अशा प्रवृत्तींना पराभूत करण्यासाठी आपण सामाजिक पुनर्जागरण चळवळींचे पोषण केले पाहिजे. केरळच्या मुख्यमंत्र्यांनी वैकोम सत्याग्रहाने मांडलेल्या उदाहरणाचा दाखला देत विविध धर्म आणि जातींमधील लोक कसे एकत्र आले आहेत यावर जोर दिला. वैकोम सत्याग्रहाचा शताब्दी सोहळा आपल्या समाजातील सामाजिक पुनर्जागरणाच्या प्रगतीत अडथळे निर्माण करणाऱ्यांविषयी  उदयोन्मुख तरूणांना आव्हानांची आठवण करून देतो. दक्षिणेतील दोन मुख्यमंत्री एकत्र येत एखादा संयुक्त राष्ट्रीय अजेंडा हाती घेण्यााचीही बहुधा स्वातंत्र्योत्तर काळातील पहिलीच वेळ आहे. उत्तर भारत पूर्णपणे मनुवादी वर्चस्व निर्माण करण्याच्या दृष्टीने वापरला जात असताना पेरियार यांच्या विचारांचा वारसा घेऊन भक्कमपणे दक्षिणेत पाय रोवून उभी राहणारी ही ओबीसी चळवळ परिवर्तनाच्या चळवळीचा नवा इतिहास घडविणार आहे.

COMMENTS