Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जे. जे. रुग्णालयात 43 हजार एचआयव्ही रुग्णांवर उपचार

 मुंबई : एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर एचआयव्ही संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी जे.जे. रुग्णालयामध्ये 1 एप्रिल 2004 रो

कास’ पठारावर विविध रंगी फुलांना बहर
महापालिकेने सुरू केली निवडणुकीची तयारी
Dhule : गावाजवळील नाल्यात ट्रक चालकाने टाकले घातक विषारी रसायन (Video)

 मुंबई : एचआयव्हीचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर एचआयव्ही संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी जे.जे. रुग्णालयामध्ये 1 एप्रिल 2004 रोजी पहिले एआरटी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राला 20 वर्ष पूर्ण झाली असून, या 20 वर्षांमध्ये जे.जे. रुग्णालयामध्ये 43 हजार 80 रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. सध्या जे.जे. रुग्णालयामध्ये तीन एआरटी केंद्र कार्यरत आहेत.
जे.जे. रुग्णालयामध्ये 1 एप्रिल 2004 मध्ये डॉ. अलका देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली एआरटी केंद्राची सुरूवात करण्यात आली. 14 सप्टेंबर 2016 रोजी दुसर्‍या एआरटी तर 1 डिसेंबर 2017 ला तिसर्‍या एआरटी केंद्राला सुरूवात करण्यात आली. आतापर्यंत पहिल्या व दुसर्‍या एआरटी सुविधेतंर्गत 43 हजार 080 रुग्णांना वैद्यकीय उपचार देण्यात आले आहे. त्यातील पहिल्या एआरटी केंद्रामध्य 5095, तर दुसर्‍या एआरटी केंद्रामध्ये 1191 आणि तिसर्‍या एआरटी केंद्राच्या माध्यमातून 379 रुग्णांना वैद्यकीय उपचार मिळाले आहेत. एचआयव्हीसह जगणार्‍या रूग्णांना विनामूल्य मिळणार्‍या या औषधांमुळे दिलासा मिळाला. जेजे रुग्णालयामध्ये सुरू झालेल्या या पहिल्या एआरटी केंद्राला आज 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त आयोजित विशेष सोहळ्यामध्ये जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, एमडॅक्सचे विजयकुमार करंजकर, नोडल अधिकारी डॉ. प्रिया पाटील, डॉ. धीरुभाई राठोड, तसेच मागील काही वर्षापासून वैद्यकीय उपचार घेत असलेल्या रुग्णांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. 20 वर्षांपूर्वी रुग्णालयामध्ये वैद्यकीय उपचारासाठी येणार्‍या एचआयव्हीग्रस्त मुलांची संख्या मोठी होती. त्यात आता घट झाली आहे. मात्र तरीही प्रत्येक वर्षी रुग्णालयाच्या एआरटी केंद्रामध्ये 600 रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी येतात. विविध पातळ्यांवर एचआयव्ही आजाराचा संसर्ग, त्याची कारणे, प्रतिबंधात्मक उपचार याबद्दल सातत्याने जनजागृती केली जाते. एचआयव्ही रुग्णांची संख्या कशी कमी करता येईल यावर विचार करण्याची गरज रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केली. एआरटी केंद्राने 20 वर्षांची पूर्तता केल्यासंदर्भात सुरू येथील वैद्यकीय सुविधेचा लाभ घेतलेल्या रुग्णांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. आशाला (नाव बदलले आहे) एचआयव्हीचा संसर्ग झाला तेव्हा तिच्या कुटुंबाने तिच्या जगण्याची उमेद सोडून दिली होती. त्यावेळी तिची मुलगी चार वर्षाची होती. मुलगी कळती होईपर्यंत तरी हिला जगवा, अशी विनवणी तिच्या पालकांनी केली होती. आशाने एआरटी उपचारपद्धती व्यवस्थित घेतली. एचआयव्हीसह ती मागील चोवीस वर्ष सर्वसामान्यांप्रमाणे आयुष्य जगत आहे.

COMMENTS