Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उंबर्डे फाट्यावरील ’त्या’अपघातातील जखमीचा मृत्यू

औंध / वार्ताहर : शुक्रवार, दि. 22 रोजी उंबर्डे फाटा येथे झालेल्या डंपर आणि दुचाकीच्या अपघातात गोपूज येथील आप्पासो किसन खराडे यांचा वडूजच्या रुग्ण

इस्लामपूर पालिकेसाठी राष्ट्रवादीचा जबाबदारी विभागण्याचा फंडा; पालिका निवडणुकीत विजयभाऊ पाटील यांची उणीव भासणार
राज्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशमुख यांची श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या समाधी मंदिरास सदिच्छा भेट
महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या अध्यक्ष पदी पी. आर. पाटील

औंध / वार्ताहर : शुक्रवार, दि. 22 रोजी उंबर्डे फाटा येथे झालेल्या डंपर आणि दुचाकीच्या अपघातात गोपूज येथील आप्पासो किसन खराडे यांचा वडूजच्या रुग्णालयात काही वेळातच त्याच दिवशी मृत्यू झाला तर जखमी नंदकुमार बापूसो देशमुख यांना अधिक उपचारासाठी कराड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली व बुधवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे ऐन यात्रा कालावधीत खराडे आणि देशमुख कुटुंबियांवर काळाने घाला घातल्याने गोपूज गावावर शोककळा पसरली आहे.
शुक्रवार, दि. 22 रोजी आप्पासो खराडे व नंदकुमार घार्गे काही घरगुती कामानिमित्त वडूजला गेले होते. कामे आटोपून दुपारी दोनच्या दरम्यान गोपूजकडे निघाले होते. दरम्यान उंबर्डे फाटा येथे समोरून येणार्‍या डंपरची जोरदार धडक बसली होती. यामध्ये स्थानिकांनी जखमींना रुग्णालयात हलविले होते. मात्र, आप्पासो खराडे यांचा काही वेळातच मृत्यू झाला. तसेच नंदकुमार देशमुख यांचे यांचाही बुधवारी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दोघेही सर्वसामान्य, कष्टकरी कुटुंबातील असल्याने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. आप्पासो खराडे (वय 45) यांच्या पश्‍चात पत्नी एक मुलगा, एक मुलगी, आई, भाऊ असा परिवार तर नंदकुमार देशमुख (वय 53) यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

COMMENTS