Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओम कदम याला बॉक्सिंगमध्ये सुवर्ण पदक

सातारा / प्रतिनिधी : लातूर येथे झालेल्या 79 व्या युथ मुलांच्या राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेमध्ये लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचा खेळाडू ओम

पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील जवान शहीद | LOKNews24
अंमली पदार्थासह गावठी कट्टा बाळगल्याप्रकरणी तिघेजण पोलीस कोठडीत
थापा मारणारा विचित्र बघितला नाही : आ. नाईक-निंबाळकर

सातारा / प्रतिनिधी : लातूर येथे झालेल्या 79 व्या युथ मुलांच्या राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेमध्ये लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचा खेळाडू ओम कदम याने नेत्रदीपक कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले. त्याने 51 ते 54 या वजन गटामध्ये सातारा जिल्ह्याचे नेतृत्व करत धुळे शहर, कोल्हापूर शहर, मुंबई जिल्हा व मुंबई उपनगर अशा मातब्बर खेळाडूंसोबत झालेल्या सामन्यांमध्ये चमकदार कामगिरीचे प्रदर्शन करून विजय प्राप्त केले. त्याच्या या कामगिरीमुळे या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू (बेस्ट बॉक्सर अवार्ड) होण्याचा बहुमान त्याने मिळवला. त्याला 7000/- रु. रोख रक्कम देवून सन्मानित करण्यात आले.
तसेच महाविद्यालयाचा विद्यार्थी विनोद राठोड याने याच स्पर्धेमध्ये पंच म्हणून काम पहिले. त्याच्या निर्विवाद व पारदर्शक निर्णयांमुळे बेस्ट रेफ्री अवॉर्डने त्याला सन्मानित करण्यात आले. लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ यांनी दोघांचा सत्कार करून अभिनंदन केले. त्याला महाविद्यालयाचे ज्युनिअर विभागाचे फिजिकल डायरेक्टर प्रा. व्ही. व्ही. भोई, डॉ. विकास जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. या खेळाडूवर प्रचंड मेहनत घेणारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक सागर जगताप यांचे प्रशिक्षण खेळाडूंना लाभले.

COMMENTS