भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादववर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. उमेश यादवचे वडील टिळक यादव यांचे बुधवारी वयाच्या74 व्या वर्षी निधन झाल

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादववर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. उमेश यादवचे वडील टिळक यादव यांचे बुधवारी वयाच्या74 व्या वर्षी निधन झाले. उमेशचे वडील गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताणा निधन झाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू उमेश यादवचे वडील टिळक यादव हे वलनी कोळसा खाणीत निवृत्त कर्मचारी होते. उत्तर प्रदेशातील पडरौना जिल्ह्यातील पोखरभिंडा गावातून टिळक यादव नोकरीच्या शोधात नागपुरात आले होते. वेस्टर्न कोलफिल्डमध्ये काम करणारे टिळक यादव हे उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
COMMENTS