Homeताज्या बातम्याविदेश

शक्तीशाली भूकंपाने एकाचवेळी तीन देश हादरले

जीवमुठीत घेऊन नागरिकांचं घरातून पलायन

गेल्या काही महिन्यांपासून जगभरात भूकंपाचे सतात्याने धक्के जाणवत आहेत. काल भारत आणि नेपाळच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर आज अफगाणि

दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने गुपचूप उरकलं लग्न ?
चित्रपट प्रदर्शिनाआधीच निर्मात्याचे निधन  
थकबाकीदार विनायक बोगा यांनी खोटा चेक दिल्याने कारावासाची शिक्षा

गेल्या काही महिन्यांपासून जगभरात भूकंपाचे सतात्याने धक्के जाणवत आहेत. काल भारत आणि नेपाळच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर आज अफगाणिस्तान आणि तजाकिस्तानमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. चीनच्या काही भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर 6.8 एवढी तीव्रता या भूकंपाची नोंदवली गेली. मात्र, या तिन्ही देशात झालेल्या भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचं वृत्त अद्याप आलेलं नाही. अफगाणिस्तानात आज पहाटे 6 वाजून 7 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू फैजाबादपासून 265 किलोमीटर अंतरावर होता. यूएसजीएसच्या नुसार, तजाकिस्तानमध्ये सकाळी 6 वाजून 7 मिनिटांनी 6.8 तीव्रतेचा भूकंप आला. हा भूकंप इतका शक्तीशाली होता की चीनच्या झिजियांग क्षेत्रातही या भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवताच हजारो नागरिकांनी जीवमुठीत घेऊन घरातून पलायन केलं. सुरक्षित ठिकाणी जाणं या नागरिकांनी पसंत केलं.

COMMENTS