Homeताज्या बातम्यादेश

डान्स ठरला मृत्यूचं कारण

उत्तर प्रदेश प्रतिनिधी - उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे बुधवारी रात्री एका लग्नसमारंभात डीजेवर डान्स करण्यावरून वधू आणि वराकडील लोकांमध्ये जो

साखर होणार स्वस्त, कारखान्यांना बसणार फटका
महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला : राज ठाकरे
लग्नात नवरदेवाने मोटारसायकलची मागणी केल्यावर सासऱ्याने चप्पलेने मारहाण केली

उत्तर प्रदेश प्रतिनिधी – उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे बुधवारी रात्री एका लग्नसमारंभात डीजेवर डान्स करण्यावरून वधू आणि वराकडील लोकांमध्ये जोरदार भांडण झालं. यादरम्यान बचावासाठी आलेल्या मुलीच्या बाजूच्या 40 वर्षीय व्यक्तीचा जखमी होऊन मृत्यू झाला. याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेऊन पोलीस कायदेशीर कारवाई करत आहेत. हे प्रकरण बुलंदशहरमधील एका बँक्वेट हॉलमधील आहे. येथे जिल्ह्यातील खानापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नवरदेवाची मिरवणूक आणली होती आणि वधू पक्षाचे लोक शहर परिसरातूनच होते. लग्नात सर्वजण जेवणाचा आस्वाद घेत होते. रात्री अकराच्या सुमारास दोन्ही बाजूचे लोक डीजेवर नाचत होते. यादरम्यान काहीतरी कारणावरुन वाद झाला आणि हाणामारी सुरू झाली. हाणामारी पाहून तेथे उपस्थित मुलीच्या बाजूचे लोक मध्यस्थी करण्यासाठी आले. बुलंदशहरच्या ज्ञान लोक कॉलनीत राहणारे ४० वर्षीय अजय मध्यस्थी करण्यासाठी डान्सिंग फ्लोअरवर पोहोचले, तेव्हा त्यांनाही मारहाण करण्यात आली. त्यामुळे ते बेशुद्ध झाले. लग्नसमारंभात एकच खळबळ उडाली. अजयला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या घटनेची माहिती मृताच्या मुलाने पोलिसांना दिली.पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. बुलंदशहरच्या एएसपी अनुकृती शर्मा यांनी दावा केला की, मृताच्या शरीरावर जखमेचं कोणतंही निशाण नाही. अंतर्गत जखमांमुळे अजयचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पोलिसांनी ४ जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला असून सर्व आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

COMMENTS