Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी कोपरगावात बेमुदत आमरण उपोषण सुरू

सकल मराठा समाजाच्या तीन कार्यकर्तेचे आमरण उपोषण सुरू

कोपरगाव प्रतिनिधी ः सबंध राज्यात मराठा आरक्षण मागणीचा जोर वाढत असताना कोपरगाव शहरात देखील सोमवार दि 11 सप्टेंबर पासून सकल मराठा समाजाच्या वतीने म

विद्यार्थ्यांना होणार मोफत शालेय साहित्य वाटप
पोपटराव आवटे यांना महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
कोपरगाव तालुक्यातील शिर्डी पोलिस स्टेशन हद्दीतील गावात घरा-घरात गणपती

कोपरगाव प्रतिनिधी ः सबंध राज्यात मराठा आरक्षण मागणीचा जोर वाढत असताना कोपरगाव शहरात देखील सोमवार दि 11 सप्टेंबर पासून सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाच्या कार्यकर्त्यानी बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
गेल्या आठवड्याभरा पासून जालना जिल्ह्यातील अंतरवाला सराटी या गावात मनोज जरांगे पाटील यांचे सरकार यांचे सरसकट मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी शांततेत उपोषण सुरू असताना राज्य शासनाने पोलिसाचा वापर करत उपोषण कर्त्यावर अमानुष पणे लाठी हल्ला करत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला परंतु या पोलिसाच्या हल्ल्याचे संपूर्ण राज्यात तीव्र  पडसाद उमटत असून सबंध राज्यात मराठा आरक्षण मागणीसाठी जोर धरू लागला आहे अनेक ठिकाणी बंद पाळत तसेच उपोषण करत सरकारवर दबाव आणण्याचे प्रयत्न मराठा समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर कोपरगाव शहरात देखील अ‍ॅड. योगेश खालकर, अनिल गायकवाड व विनय भगत या सकल मराठा समाज कोपरगावच्या कार्यकर्त्यांनी सोमवारपासून छत्रपती शिवाजी महाराज स्मरका जवळ आमरण उपोषण सुरू केले असून शहरासह तालुक्यातील अनेक संघटनांनी त्यांना पाठिंबा दर्शवत उपोषण स्थळी भेट दिली आहे. याप्रसंगी उपोषणकर्त्यांनी बोलताना सांगितले की, राज्य सरकारने केंद्र सरकारला कायदेशीर पाठपुरावा करून येणार्‍या लोकसभेच्या अधिवेशनात भारतीय राज्यघटनेत दुरुस्ती करून शेड्युल 9 मध्ये आरक्षण द्यावे, सर्वोच्च न्यायालयाकडे प्रलंबित असलेली क्युरेटिव्ह पिटीशन बाबत कारवाई करावी, राज्य सरकारने केंद्र मागास आयोग यांच्याकडे मराठा आरक्षणाबाबत पाठपुरावा करावा तसेच सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकेल असे उचित भक्कम आरक्षण देण्याची कारवाई शासनाने करावी  अशी मागणी या उपोषणकर्त्यांनी शासनाकडे केली आहे. उपोषण स्थळी शहरासह तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी यांची हजेरी, तर अनेकांनी आपआपल्या संघटना,पक्ष, ग्रामपंचायत आदींची पत्रे देत पाठींबा दर्शवित दिवसभर उपोषण स्थळी बसून शासनाचा केला निषेध.

COMMENTS