Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोपटराव आवटे यांना महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

शेवगाव तालुका ः शेवगाव तालुक्यातील दहिगावने संचलित भातकुडगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय भातकुडगाव मधील हिंदी विषयाचे प्राध्यापक पोपटराव हरिश

धान्य विकणार्‍या रेशन दुकानदार मोकाटच ; कारवाईसाठी उपोषणचा इशारा
लॉकडाउन सुरू होण्यापूर्वी दारू खरेदीसाठी उडाली धावपळ! पहा सुपरफास्ट २४ | LokNews24
रस्त्यांच्या निधीसाठी संरपचांसह ग्रामस्थांची थेट मंत्रालयात धाव

शेवगाव तालुका ः शेवगाव तालुक्यातील दहिगावने संचलित भातकुडगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय भातकुडगाव मधील हिंदी विषयाचे प्राध्यापक पोपटराव हरिश्‍चंद्र आवटे यांना नुकताच शिव स्वराज्य बहुउद्देशीय संस्था नेवासा यांच्या मार्फत राज्य स्तरीय महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.
या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो असा पुरस्कार नुकताच नेवासा येथील श्रीराम साधना आश्रम मुकिंदपुर येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प.सुनिल गिरी महाराज, कॉ. बाबा अरगडे, निवृत्त शिक्षण अधिकारी (गंगापूर) धोंडीराम सिंह राजपूत व शिव स्वराज्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष संजय वाघमारे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र,शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्‍वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. नरेंद्रजी घुले पाटील, संस्थेचे सचिव तथा माजी आमदार.चंद्रशेखर घुले पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्षा राजश्रीताई चंद्रशेखर घुले. पंचायत समिती शेवगाव अध्यक्ष सभापती डॉ.क्षितिज घुले पाटील, प्रशाकिय अधिकारी के.वा.नजन, काशिद, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थांनी प्राध्यापक पोपटराव हरिश्‍चंद्र आवटे यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.परिसरातूनही त्यांचे स्वागत होत आहे.

COMMENTS