Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महान सम्राट अशोका चा आदर्श आजच्या राज्यकर्त्यांनी घ्यावा-  विजय साळवे

माजलगाव प्रतिनिधी - जगाच्या इतिहासातील महान  राजा सम्राट अशोक यांनी स्वतःच्या कर्तुत्वाने  राज सिंहासन मिळविले परंतु अनेक लढाया करून जगावर राज्य

दहशतवादी अकबर पाशाच्या सांगण्यावरून गडकरींना धमकी
लग्नाचा वाढदिवस नव्हे पश्चाताप दिन ! पोलीस कर्मचाऱ्याचा अर्ज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे विद्यार्थी सारथी निबंध स्पर्धेत प्रथम

माजलगाव प्रतिनिधी – जगाच्या इतिहासातील महान  राजा सम्राट अशोक यांनी स्वतःच्या कर्तुत्वाने  राज सिंहासन मिळविले परंतु अनेक लढाया करून जगावर राज्य करणार्‍या व एक संघाचा भारतदेश व पूर्वीचा जंबुद्वीप  निर्माण करणार्‍या  महान सम्राट अशोक यांनी प्रजेच्या आणि आपल्या देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी राज्यकारभार चालविला, केवळ माणसांनाच नव्हे तर प्राण्यांना सुद्धा ठिकठिकाणी दवाखाने, राज्या मध्ये पक्के रस्ते ,प्रवाशांना रहदारीचे पक्के पानवटे ,प्रवासात  थकले तर मुक्कामासाठी आराम ग्रह असे लोक उपयोगी व कल्याणकारी राज्य कारभार केला त्या जगातील महान सम्राट राजा अशोकाचा आदर्श आजकालच्या राज्यकर्त्यांनी घेऊन राज्यकारभार करावा असे  म्हणून सम्राट राजा अशोक यांच्या 2327 व्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करताना राजगृह सम्राट अशोक नगर माजलगाव येथे स्वाभिमानी रिपब्लिकन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विजय दादा साळवे यांनी व्यक्त केले ,पुढे बोलताना विजय दादा साळवे म्हणाले की आपल्या पराक्रमाच्या जोरावर इसवीसन पूर्व तिसर्‍या शतकात चक्रवर्ती सम्राट पदावर पोहोचलेल्या सम्राट अशोकाने कलिंग युद्धातील नरसाहार बघून तथागत बुद्धांचा शांतीचा,प्रेमाचा मैत्री व करूणेचा मार्ग स्वीकारून जगात बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार आपल्या सम्राट पदाच्या काळात केला त्यांनी केलेला राज्यकारभार व लोककल्याणकारी भारत देश कधीच विसरू शकणार नाही. प्रगतीचे ,गतीचे ,चक्र सतत फिरावे अशा आपल्या राष्ट्रीय ध्वजावरील अशोक चक्रांचे प्रतीक आठवण करून देत असते असेही पुढे विजय दादा साळवे हे म्हणाले त्यांनी बौद्ध धम्माला राजाश्रय देऊन त्यांच्या अर्ध्या जगावर जम्बुद्वीप राज्यात ठिकठिकाणी 84 हजार बौद्ध विहार, स्तूप,स्तंभ उभारले व ते आज संपूर्ण भारतात ठीक ठिकाणी खोदकामात दिसून येतात त्यांनी आपल्या राज्याचे कल्याणकारी राज्य म्हणून राज्यकारभार केलेले आजच्या राज्यकर्त्यांनी व राजकारण्यांनी जगातील महान सम्राट राजा अशोक यांचा आदर्श कारभार करीत असताना घ्यावा या सम्राट अशोक यांच्या 2327 व्या जयंती अभिवादन कार्यक्रमाला स्वाभिमान  रिपब्लिकन पक्षा चे  बीड जिल्हा संघटक अंजराम घनघाव , मुरलीधर  साळवे सर  ज्येष्ठ नेते मा.पंचायत समिती सदस्य ,राजेश साळवे माजी बांधकाम सभापती, ओम प्रकाश टाकणखार ड्रेसी टेलर  विश्वनाथ तोडके, अतुल भदर्गे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे माजलगाव तालुका अध्यक्ष पंडित अण्णा ओव्हाळ, युवक तालुका अध्यक्ष वशिष्ठ भाऊ लांडगे,विशाल साळवे यांच्यासह स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे  बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS