Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हैस चोरीप्रकरणी एकास अटक

फलटण /प्रतिनिधी :आसू, ता. फलटण परिसरातील मळशी नावाच्या शिवारातील म्हैस चोरल्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी एकास अटक करून सुमारे 3 लाख 90 हजार

बेलवडे विकास सेवा सोसायटी निवडणूकीत सत्तांतर
बळीराजा आंदोलनावर ठाम
छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार युवा पिढीपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न : ना. उदय सामंत

फलटण /प्रतिनिधी :आसू, ता. फलटण परिसरातील मळशी नावाच्या शिवारातील म्हैस चोरल्या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी एकास अटक करून सुमारे 3 लाख 90 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, दि. 29 ऑक्टोबर रोजी आसू, ता. फलटण येथून मुर्‍हा जातीची 90 हजार रुपये किंमतीची म्हैस अज्ञाताने चोरल्याची तक्रार दाखल झाली होती. गुन्हा दाखल होताच जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोर्‍हाडे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे फलटण तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली बरड पोलीस स्टेशनचे सपोनि अक्षय सोनवणे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांची टीम तयार करण्यात आली.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना आसू ग्रामस्थांनी खाजा हाजी शेख नावाच्या इसमावर संशय व्यक्त केला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित फलटण परिसरात नसल्याने या अनुषंगाने सपोनि अक्षय सोनवणे यांनी खाजा शेख याची गोपनीय माहिती घेवून मोबाईल लोकेशनवरून संशयित व त्याने गुन्ह्यात वापरलेला छोटा हत्ती जप्त करण्यात आला. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशनवरून कौशल्यपुर्ण रित्या सर्व पुरावे गोळा करून चौकशी केली असता गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यास अटक करून कोर्टात हजर केले असता 4 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.
याकामी सपोनि अक्षय सोनवणे यांच्या समवेत सहायक फौजदार सुधाकर सुर्यवंशी, हवालदार अशोक टिळेकर, बबन साबळे, अमोल कर्णे, संतोष विरकर, अवघडे यांनी विशेष कामगिरी केली. तसेच ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.
बरड पोलीस ठाण्यात सपोनि अक्षय सोनवणे दाखल झाल्यापासून अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये खटकेवस्ती येथील डीपी चोर तसेच मुंजवडी येथील अवैध विषारी दारू निर्मिती तसेच अनेक इतर गुन्हे उघडकीस आले असून बरड पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

COMMENTS