Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिल्ह्यातील रुग्णालयाचा भोंगळ कारभार मांडणार

आ. अमोल मिटकरी

अकोला प्रतिनिधी - अकोला जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्णांना चांगली सुविधा मिळावी यासाठी मेडिकल कॉलेज आणण्यात आले आणि या मेडिकल कॉलेज मध

सामाजिक न्याय विभागाकडून ‘त्या’ संस्थांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न
अमोल मिटकरी हे लोकांना भुलवून आपल्या सत्तेची पोळी शेकवतात
राष्ट्रवादीचे आ.अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा झटका LokNews24

अकोला प्रतिनिधी – अकोला जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील रुग्णांना चांगली सुविधा मिळावी यासाठी मेडिकल कॉलेज आणण्यात आले आणि या मेडिकल कॉलेज मध्ये भावी डॉक्टर तयार होत आहेत.पण हे डॉक्टर जिल्हा सामान्य रुग्णालयात कशी सेवा देतात याकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे निदर्शनात आले असून जिल्हा सामान्य रुग्णालय हे वाऱ्यावर असून या रुग्णालयात सगळीकडे भोंगळ कारभार सुरु असल्याचे चित्र समोर आले आहे. या रुग्णालयात एका 14 महिन्याच्या बाळाला एका 14 वर्ष वयाच्या मुलाचे ओषध लिहून दिले. त्या डिस्पक्रिपशन वर कुठल्याही डॉक्टर ची सही नाही आहे.त्यामुळे त्या 14 महिन्याच्या बाळाला जर काही झाल्यास याला जबाबदारी कोण राहील. अकोला जिल्ह्यात आरोग्याच्या नावाखाली कश्याप्रकारे काळा बाजार सुरु आहे याचे स्ट्रिंगऑपरेशन करुन विधानपरिषदेच्या सभापतींकडे मांडणार.  असा प्रश्न अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला असून येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचा इशाराही यावेळी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे.

COMMENTS