Homeताज्या बातम्यासंपादकीय

एकविसाव्या शतकातील पहिल्या पाव शतकात…..!

जगाला २१ व्या शतकात प्रवेश करून आता पाव शतक होत आले आहे; पाव शतकाच्या प्रारंभाचा आज पहिला दिवस ! ज्याला सगळं जग नवीन वर्षारंभ म्हणून ओळखते आहे. प

पोलीस शिपायांची सर्व रिक्त पदे भरणार
समाजाने हिणवलं… नियतीने दुखावलं…परंतु परिश्रम, जिद्द व चिकाटीने तृतीयपंथी पोलिस दलाची परिक्षा झाली उत्तीर्ण 
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे शासनाने पंचनामे करून शेतकऱ्यांला मदत करावी | LOKNews24

जगाला २१ व्या शतकात प्रवेश करून आता पाव शतक होत आले आहे; पाव शतकाच्या प्रारंभाचा आज पहिला दिवस ! ज्याला सगळं जग नवीन वर्षारंभ म्हणून ओळखते आहे. परंतु, हा एका शतकाच्या पहिला भाग पूर्ण होण्याचा प्रारंभ आहे. २१ व्या शतकाच्या या पाव शतकाच्या वाटचालीत आम्ही मानव समाज म्हणून कुठपर्यंत आलो आणि कुठे जायचं, हा आजच्या दिवशी सर्वांनी अंतर्मनाने आणि जाहीरपणानेही व्यक्त होण्याचा दिवस आहे, असं आज आम्हाला वाटतं. जगाचा २१ व्या शतकातला प्रवेश हा ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान या दिशेने झेपावत जाईल; ही बाब स्पष्ट होते. २१ वे शतक हे तंत्रज्ञानाचे शतक आहे. याची सर्वात पहिली ओळख भारतामध्ये राजीव गांधी यांनी संगणक प्रणाली लागू करून, म्हणजे नव्या शतकाच्या प्रारंभापूर्वीच पंधरा वर्षे आधी भारताचा प्रवेश तंत्रज्ञान युगात झाला होता. त्याच काळामध्ये दूरध्वनी यंत्रणा विकसित करण्यात आली होती; ज्याचं श्रेय, आज अमेरिकेत वास्तवाला असलेले सॅम पित्रोदा यांना जाते. आज भारतच नव्हे तर जग हे काय च्या युगात प्रवेश करीत आहे. तंत्रज्ञानाची अतिशय आधुनिक प्रणाली, आज जगाच्या अवतीभोवती वावरते आहे. कोणतेही विज्ञान आणि तंत्रज्ञान हे मानवाच्या श्रमाला आणि मानवाच्या कष्टाला कमी करण्यासाठी आणि त्याला अधिक प्रगत करण्यासाठी, सुखावह जीवन जगत-नव्या समाजाच्या रचनेत वापरावा यासाठीच असते. अणूचा शोध लावणाऱ्या आईन्स्टाईन यांनी देखील त्यावेळी म्हटलं होतं की, अणू चा शोध हा मानवाच्या उत्थानासाठी लावलेला आहे. त्याचा मानवाने सकारात्मक आणि विकासासाठी उपयोग करावा; परंतु, कोणत्याही गोष्टीला जेव्हा दोन बाबी असतात, तेव्हा, माणूस त्याचा उपयोग हा दोन्ही कडून करू शकतो. कारण, समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवृत्ती कायमच वावरत असतात. आजच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आपण म्हणतो, त्याचा प्रयोग करून चांगल्या गोष्टी निर्माण करण्याऐवजी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अनेक बदनामीकारक गोष्टीही केल्या जातात. त्यामुळे विज्ञान-तंत्रज्ञान हे मानवासाठी वरदान असलं तरी, मानव समाजातील प्रवृत्ती ते त्याच्यासाठी याच वरदान असलेल्या गोष्टींना शाप देखील ठरवू शकतं! वरदान आणि शाप या दोन्ही गोष्टी मानवी प्रवृत्तीचा भाग आहेत. मानव समाज त्या गोष्टी कशा स्वीकारतो यावर बरंच काही अवलंबून असतं. पण, आजच्या पाव शतकाच्या या प्रारंभ दिनी, सबंध भारतीयांना, वैश्विक माणसाला, हे आव्हान करू इच्छितो की, आपलं रक्त आटवत शास्त्रज्ञांनी जे शोध लावले आहे, त्या शोधाच्यामागची प्रेरणा मानवी समाज जीवन अधिकाधिक सुखावह व्हावं आणि त्या मानवी जीवनाच्या टप्प्यामध्ये प्रत्येकाला विकासाचा आणि त्या दृष्टीने सुसह्य जीवनाचा अनुभव यावा, यासाठीच ते झटलेले आहेत! परंतु, या गोष्टींचा जर आपण विपरीत उपयोग केला तर, त्या निश्चितपणे मानवी जीवनाला शाप ठरते. अशा पद्धतीने जर आपण तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा दुरुपयोग केला तर ज्या शास्त्रज्ञांनी मानवी समाज जीवनासाठी झिजून आपलं आयुष्य पणाला लावलं आहे, त्या शास्त्रज्ञांना ती कायम बोच राहील! अर्थात, ते पाहण्यासाठी या विश्वात कदाचित हयातही नसतील; परंतु, त्यांनी उराशी बाळगलेले स्वप्न एक माणूस म्हणून आपण ते अमलात आणण्याची जबाबदारी आपली नैतिक जबाबदारी ही आहे आणि कर्तव्य ही आहे! आजच्या या पाव शतकाच्या अंतिम वर्षात आपण प्रवेश करत असताना, मानवी समूहाला अधिक जबाबदारीने वागण्याचं भान यावं. विज्ञान-तंत्रज्ञानाला आपण तोपर्यंत अधिक चांगल्या प्रभावीपणे स्वीकारू शकत नाही किंवा राबवू शकत नाही; जोपर्यंत, आम्ही मानवी जीवनात शांतता, सलोखा, समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांची जोपासना करत नाही. तोपर्यंत मानवी समाजाला विज्ञान आणि तंत्रज्ञान हे कितीही विकसित केलं, तरी, ते शाप ठरण्याचा धोका निश्चितपणे राहील. त्यामुळे, समाज जीवनात जगत असताना मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी शोध किंवा विज्ञान-तंत्रज्ञान या आवश्यक बाबी असतानाही मानवी जीवनाला मात्र पहिलं प्राधान्य, हे मानवी मूल्य सत्य, अहिंसा, करुणा, न्याय, बंधुता या मूल्यांना द्यावं लागेल. मानवी समाजाला कायम लोकशाहीच्या छत्राखाली वावराव लागेल. कारण, लोकशाही व्यवस्था ही मानवी जीवनाला अधिक सुसह्य आणि योग्य असणारी राज्यव्यवस्था ही आहे.

COMMENTS