Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोयता गँगचा विद्यार्थ्यावर हल्ला

पुणे पोलिसांकडून तिघांना अटक

पुणे/प्रतिनिधी : पुणे शहरामध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून कोयता गँगचा धुमाकूळ सुरू असून, बुधवारी पुन्हा एकदा सदाशिव पेठेतील टिळक रोडवर एमपीएसस

कोपरगावकरांचा धारणगाव रस्त्याचा त्रास होणार कमी रस्त्याचे लवकरच काम सुरु होणार -आ. आशुतोष काळे
पूरग्रस्त जळगाव, संग्रामपूरची जयश्रीताई शेळकेंनी केली पाहणी  
श्री गजानन नागरी सहकारी बँकेला 2 कोटी 24 लाखाचा नफा

पुणे/प्रतिनिधी : पुणे शहरामध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून कोयता गँगचा धुमाकूळ सुरू असून, बुधवारी पुन्हा एकदा सदाशिव पेठेतील टिळक रोडवर एमपीएससीची तयारी करत असलेल्या तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले आहे. त्यामुळे शहरात खळबळ उडाली असून आरोपींनी या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच पुण्यात एका तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता एका विद्यार्थ्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सदाशिव पेठ परिसरातील टिळक रोडवरून सुभाष शेवाळे, ओम भिलारे आणि फिर्यादी तरुण मंगळवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास रुमवर जात होते. लायब्ररीतून परत येत असतानाच शक्ती स्पोर्ट्स दुकानासमोर पांढर्‍या रंगाचे ऍक्टिवा गाडीवर आलेल्या तिघांनी तरुणावर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. सुदैवाने तरुणाने आरडाओरड केल्याने आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. आरोपींच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला त्याच्या मित्रांनी उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर जखमी तरुणाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विद्यार्थ्यावर हल्ला करण्यात आल्याची घटना समजताच पुणे पोलिसांनी टिळक रोडवरील सीसीटीव्ही फूटेज तपासत आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. आरोपींची ओळख पटताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली आहे. त्यानंतर आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे. जखमी तरुणाची प्रकृती स्थिर असून आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

COMMENTS