Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टाकळीच्या शंभर वर्षाच्या आजीने बजावला मतदानाचा हक्क

कोपरगाव तालुका ः टाकळी गावामध्ये शिर्डी लोकसभा मतदार संघाचे पहिले मतदान टाकळी गावातील ज्येष्ठ आजी श्रीमती यशोदाबाई सोपान देवकर वय वर्ष 100 यांनी

अमृतवाहिनीच्या 72 विद्यार्थ्यांना अमृत मेरीटोरीयस स्कॉलरशिप
डॉ. तनपुरे कारखाना उस गाळप हंगामासाठी सज्ज
वीज कोसळून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू l पहा LokNews24

कोपरगाव तालुका ः टाकळी गावामध्ये शिर्डी लोकसभा मतदार संघाचे पहिले मतदान टाकळी गावातील ज्येष्ठ आजी श्रीमती यशोदाबाई सोपान देवकर वय वर्ष 100 यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक अधिकार्‍यांनी लोकशाहीच्या मार्गाने घरपोच यंत्रणा वापरून वृद्ध अपंग व आजारी अशा मतदारांना ही सुविधा उपलब्ध करून दिली या मतदान प्रक्रियेचे वेळेस तीन अधिकारी व दोन पोलीस कॉन्स्टेबल यांच्यासमोर त्यांच्या राहत्या घरी  पार पडली यावेळी  टाकळी गावचे सरपंच  संदीप श्रीपत देवकर तसेच त्यांचा मुलगा मच्छिंद्र सोपान देवकर त्यांच्या दोन सुनबाई चार नातवंड शंतनु ,कृष्णा, मुद्दा आणि श्रेयस व पुतण्या संदीप अण्णासाहेब देवकर हे सर्व उपस्थित होते ह्या आजीबाईंची प्रेरणा घेऊन सर्व मतदारांनी जागृत होऊन येणार्‍या 13 तारखेला आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन टाकळीचे  सरपंच संदिप देवकर यांनी केले आहे.

COMMENTS