Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रकाश हॉस्पिटलमध्ये 120 महिलांची मोफत शस्त्रक्रिया

इस्लामपूर / प्रतिनिधी : धन्वंतरी आरोग्य सेवक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष एस. एल. कुंभार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाश हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सें

फलटण तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा; साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त
ए. आर. पवार म्हणजे कोण रं भाऊ : रमाकांत डाके
सांगवड पुलाजवळ भीषण अपघात; 3 ठार, 2 गंभीर

इस्लामपूर / प्रतिनिधी : धन्वंतरी आरोग्य सेवक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष एस. एल. कुंभार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाश हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर येथे मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात 120 महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली.
प्रकाश हॉस्पिटल अ‍ॅन्ड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते. याचा इस्लामपूर शहराची सांगली जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांना फायदा होत असतो. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरात वाळवा तालुक्याचा सांगली जिल्ह्यातील 120 महिलांनी सहभाग घेतला. या सर्व महिलांच्यावर मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या. या सर्व रुग्णांनी व त्यांच्या कुटुंबातील घटकांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाचे आभार मानले.
धन्वंतरी आरोग्य सेवक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष एस. एल. कुंभार यांना वाढदिवसानिमित्त प्रकाश शिक्षण आरोग्य व उद्योग समूहाची मार्गदर्शक नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे, वाळवा तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रकाश हॉस्पिटल अ‍ॅड रिसर्च सेंटरचे मेडिकल प्रशासन अधिकारी डॉ. भोपाल गिरीगोसावी, डॉ. अभिमन्यू पाटील, अभिजीत पाटील, जयदीप निकम, सुजित पाटील, रणजित पाटील, रोहन जाधव, विश्‍वजीत पाटील, रणधीर फारणे आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
मोफत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीतेसाठी प्रकाश हॉस्पिटलच्या स्त्रीरोग विभाग प्रमुख सुप्रिया वायदंडे, डॉ. आशा जोशी, डॉ. राहुल कुंभार, डॉ. विशाल मंडले, डॉ. नीलम पाटील, भूलतज्ञ डॉ. संगीता सायमते, डॉ. पूजा काकडे, नर्सिंग अधिकारी सतीश वंजिरे व जनसंपर्क अधिकारी सुदर्शन जाधव यांनी विशेष प्रयत्न केले.

COMMENTS