Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगावात डाक विभागाच्या विविध योजनांसंबंधी कार्यक्रम उत्साहात

शेवगाव तालुका ः भारत सरकार संचार मंत्रालय डाक विभाग यांच्यामार्फत सप्टेंबर 2024 अखेर संपूर्ण देशांमध्ये 5000 गावांमध्ये डाक समुदाय विकास प्रकल्प

राहुरीत अक्षता मंगल कलशाचे जल्लोषात स्वागत
दिव्याखाली अंधार… चोरांनी दाखवला पोलिसांना हिसका ; पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलिसांचीच वाहने असुरक्षित
रेनबो स्कूलचे जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत यश

शेवगाव तालुका ः भारत सरकार संचार मंत्रालय डाक विभाग यांच्यामार्फत सप्टेंबर 2024 अखेर संपूर्ण देशांमध्ये 5000 गावांमध्ये डाक समुदाय विकास प्रकल्प अंतर्गत डाक चौपाल म्हणजेच प्रत्येक गावामध्ये केंद्र सरकारच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. नुकताच संचार मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारलेले मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अभिनव संकल्पनेतून गावातील प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत डाक विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या योजना पोहोचाव्यात हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून ही योजना हाती घेण्यात आली असल्याचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितले.
पोस्ट विभागात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची खाते संबंधित महिलांच्या आधार कार्ड व मोबाईलच्या सहाय्याने फक्त दोनशे रुपयात उघडण्यात येणार आहेत, पी एम किसान मातृ वंदना इत्यादी योजनेचे खाते तसेच डाक विभागाच्या इतर योजना आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक करणे, पोस्ट ऑफिस सेविंग खाते रिकरिंग खाते, अथवा मुदत ठेव योजना, महिला सन्मान योजना, अपघाती विमा, ग्रामीण टपल जीवन विमा, पासपोर्ट सुविधा इत्यादी सेवांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. संपूर्ण भारतातील पाच हजार गावांपैकी शेवगाव या गावाची डाक चौपाल अंतर्गत निवड झाली ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतीय डाक विभाग हा केंद्र सरकारच्या योजना ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत असल्याचे प्रतिपादन श्री रामेश्‍वर ढाकणे यांनी व्यक्त केले. आमदार मोनिकाताई राजळे यांनी शेवगाव तालुक्यातील गरीब कुटुंबातील तीनशे मुलींचे सुकन्या समृद्धी खाते उघडण्यासाठी मदत केल्याबद्दल त्यांचे भारतीय डाक विभागामार्फत आभार व्यक्त करण्यात आले.या कार्यक्रमासाठी अहमदनगर विभागाचे डाक निरीक्षक श्री हनुमंत चव्हाण, श्री घनश्याम शहा, श्री दीपक भुसारी, श्री विशाल घुले, खझझइ ब्रांच चे दिगंबर सोनवणे, भाजपाचे जेष्ठ नेते बापुसाहेब भोसले, भिमराज सागडे, बापुसाहेब धनवडे, गणेश रांधवणे, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अशासकीय सदस्य कचरू चोथे, अशोकराव आहुजा, सागर फडके, महेश फलके,  शिवाजीराव भिसे, सामाजिक कार्यकर्ते वसुधा सावरकर, उषाताई कंगणकर, डॉ. पाटील, संदीप खरड, विष्णुपंत घनवट, शेखर महाराज मुरदारे, कैलास सोनवणे, पत्रकार शाम पुरोहित, एकनाथ खोसे, अनिल सुपेकर, किरण काथवटे, अमोल माने तसेच शेवगाव तालुक्यातील सर्व पोस्टल ग्रामीण डाक सेवक कर्मचारी यांचेसह  शेवगाव   तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समृृद्धी योजनेचे उघडले खाते – बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाअंतर्गत केंद्र सरकारने सुरू केलेल्या सुकन्या समृध्दी योजनेचा लाभ सामान्य कुटुंबातील मुलींना मिळावा याकरिता आमदार मोनिकाताई राजळे यांनी पोस्ट कार्यालयात 300 मुलींच्या सुकन्या समृध्दी योजनेचा पहिला हप्ता भरून खाते उघडले व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जास्तीत जास्त मुलींना सहभागी करून घेणेसाठी आवाहन केले. 

COMMENTS