लाच घेणार्‍या लेखापरीक्षकास दंडासह सश्रम कारावास

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाच घेणार्‍या लेखापरीक्षकास दंडासह सश्रम कारावास

अहमदनगर/प्रतिनिधी : पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहाराचा अहवाल मागणीप्रमाणे तयार करून देण्यासाठी 3 लाखाची मागणी करून या लाचेच्या रकमेपैकी तीस हजार रुपये

डाँ.तनपुरे कामगारांसाठी ‘प्रहार’ स्टाईलने आंदोलन
व्यावसायिकाने पत्नीची हत्या करून केली आत्महत्या
नगर अर्बन बँकेत भूकंप, सस्पेन्स ; घोटाळ्यात गांधी बंधूंना केले आरोपी ; सुरेंद्र व देवेंद्र गांधींना समन्स जारी

अहमदनगर/प्रतिनिधी : पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहाराचा अहवाल मागणीप्रमाणे तयार करून देण्यासाठी 3 लाखाची मागणी करून या लाचेच्या रकमेपैकी तीस हजार रुपये स्वीकारत असताना रंगेहात पकडलेला सहकारी संस्था भरारी पथक अहमदनगरचा लेखापरीक्षक (वर्ग दोन) अनंत सुरेश तरवडे याला दंडासह सश्रम कारावासाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली.
या प्रकरणी वसंतदादा सहकारी पतसंस्था (टाकळीढोकेश्‍वर) या संस्थेचे तत्कालीन चेअरमन राजेंद्र रघुनाथ गागरे (राहणार टाकळी ढोकेश्‍वर) यांनी तक्रार दिली होती. त्यांनी वर्धमान सहकारी पतसंस्था (गणेशनगर, तालुका राहता, जिल्हा अहमदनगर) या संस्थेमध्ये आपली पतसंस्था विलनीकरण केली. त्यावेळी वर्धमान पतसंस्थेचे लोकसेवक लहानु वामन थोरात यांनी तत्कालीन चेअरमन व संचालक मंडळ व कर्मचारी यांच्यावर अफरातफरीचा गुन्हा दाखल केला. पण, ही कारवाई सूडबुद्धीने केली आहे म्हणून त्यासंबंधी सहकार खात्याकडे गागरे यांनी तक्रार केली होती. त्याची चौकशी करून त्याचा अहवाल तयार देण्याची जबाबदारी तरवडे याच्याकडे सोपवण्यात आली होती. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान गागरे यांच्या मागणीप्रमाणे अहवाल तयार करून देण्यासाठी लेखापरीक्षक तरवडे याने 3 लाख रुपये लाचेची मागणी केली व या लाचेच्या रकमेपैकी तीस हजार रुपये स्वीकारत असताना अनंत तरवडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक इरफान शेख यांनी रंगेहात पकडले. त्यानंतर सहकार उपसचिव सुधीर गायकवाड यांच्या मान्यतेनंतर याप्रकरणी दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आले. या खटल्याची सुनावणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम.शेटे यांच्यासमोर झाली. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता विष्णुदास के. भोर्डे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार चार वर्ष सश्रम कारावास व रुपये पन्नास हजार रुपये दंड शिक्षा ठोठावली. या खटल्यामध्ये महिला पोलिस कॉन्स्टेबल संध्या म्हस्के व पैरवी अधिकारी सहाय्यक फौजदार यांनी सरकारी वकिलांना सहकार्य केले.

COMMENTS