महिला पोलिस उपनिरीक्षकांनी हनुमान रथाला लावला मानाचा ध्वज

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिला पोलिस उपनिरीक्षकांनी हनुमान रथाला लावला मानाचा ध्वज

।संगमनेर/प्रतिनिधी : हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणारा वाद टाळण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने अखेर एक पाऊल शनिवारी मागे घेतले. यामुळे शह

पेट्रोल व डिझेल न देण्याच्या सक्त सूचना ; फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच मिळणार | ‘आपलं नगर’ | LokNews24
खासगी सावकारीतून तरूणावर शस्त्राने वार
नगर शहरात ‘या’ ठिकाणी महाराजांचा १२ फुट पुतळा उभारणार | LOKNews24

संगमनेर/प्रतिनिधी : हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणारा वाद टाळण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने अखेर एक पाऊल शनिवारी मागे घेतले. यामुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या हस्ते रथावर मानाचा ध्वज लावण्याची परंपरा खंडित झाली असली तरी हा मान इतिहासात प्रथमच एका महिला पोलीस उपनिरीक्षकाला मिळाला आहे. शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांच्या हस्ते पोलीस ठाण्यापासून मानाचा ध्वज मिरवणुकीने वाजत गाजत आणण्यात आला.

महाले यांनी हा ध्वज हनुमान विजय रथावर लावला. त्यानंतर हनुमान रथाच्या विजयी मिरवणुकीला सुरुवात झाली. गोवंश हत्या आणि तस्करीमध्ये रक्ताने हात माखलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना मानाचा ध्वज लावण्यापासून रोखण्याचा इशारा येथील विधिज्ञ श्रीराम गणपुले यांनी दिला होता. या पार्श्‍वभूमीवर मिरवणुकीत वाद निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र जिल्हा पोलिस प्रशासनाने वाद टाळण्यासाठी आरोप असलेल्या अधिकाऱ्यांना हा ध्वज घेऊन जाण्यास मनाई केली. त्यामुळे हा मान प्रथमच संगमनेरच्या रथ मिरवणुकीच्या इतिहासात महिला पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांना मिळाला.गेल्यावर्षी महात्मा गांधी जयंती दिनी संगमनेरमधील बेकायदेशीर कत्तलखान्यावर राज्यातील मोठा छापा नाशिक आणि नगरच्या पोलीस पथकाने टाकला होता. या छाप्यात आर्थिक तडजोडीचा महत्त्वपूर्ण दस्तावेज पोलिसांच्या हाती लागला. यातून या गोवंश जनावरांच्या हत्येत कोण-कोणत्या अधिकार्‍याचे हात रक्ताने माखले आहे, याची जाहीरपणे चर्चादेखील झाली.त्यामुळे हनुमान जयंती उत्सवाच्या वेळी निघणाऱ्या विजय रथाची पूजा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना करू दिली जाणार नाही, त्याऐवजी वरिष्ठांनी दुसरा अधिकारी पाठवावा. अशा मागणीचा पत्रव्यवहार गणपुले यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांशी केला. त्यामुळे हनुमान जयंती मिरवणूकीत वाद निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली होती. मात्र उत्सव समितीने पोलीस निरीक्षकांना कार्यक्रमासंदर्भात माहिती दिल्याने यात गट निर्माण झाल्याची चर्चा शहरात सुरू झाली. या पार्श्वभूमीवर शनिवारी मिरवणुकीवेळी काय घडणार याबाबत साशंकता होती. मान डावलला; सन्मान मिळाला दरम्यान या संदर्भात पोलिस प्रशासनाच्या वरिष्ठ स्तरावरून निर्णय घेण्यात आला आणि एका निर्णयामुळे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांचा मान रोखला गेला. या कारणावरून वाद नको अशी भूमिका पोलीस प्रशासनाने घेत निरीक्षक देशमुख यांच्या ऐवजी महिला पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांच्या हस्ते हा मानाचा ध्वज पाठविण्याचा निर्णय घेतला. महाले यांनी हा ध्वज रथावर लावल्याने संभाव्य वाद शमला. असे असले तरी पोलिस निरीक्षक यांच्या हस्ते मानाचा ध्वज लावण्याची परंपरा खंडित झाली आहे. वाद टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला असला तरी यातून पोलीस निरीक्षकांच्या मान संगमनेरच्या हनुमान जयंती उत्सवाच्या इतिहासात खंडित झाला असल्याचे समोर आले. गोहत्या आणि गोमांस तस्करीत पोलिस अधिकाऱ्यांचे हात रक्ताने माखले आहेत, हा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप पोलीस प्रशासनाने मान्य केला का असा प्रश्नदेखील त्यातून निर्माण झाला.

COMMENTS