मेंढपाळांना पिस्तुल व परवाना द्या ; संघर्ष समितीच्या शेंडगेंची मागणी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मेंढपाळांना पिस्तुल व परवाना द्या ; संघर्ष समितीच्या शेंडगेंची मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी- मेंढपाळांना पिस्तुल व त्याचा परवानादेण्याची मागणी धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष इंजिनिअर डी. आर. शेंडगे यांनी केली आहे. तस

माझ्या मतदार संघातील जनता सुखी राहू दे
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींचे विचार समाजाला प्रेरणादायी
एसटी कर्मचारी उपोषणाच्या पवित्र्यात; दिवाळीपूर्वी भत्ते व थकबाकी देण्याची मागणी

अहमदनगर/प्रतिनिधी- मेंढपाळांना पिस्तुल व त्याचा परवानादेण्याची मागणी धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष इंजिनिअर डी. आर. शेंडगे यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी जिल्ह्यातील तीन मंत्री म्हणजे महसूल मंत्री बाळासाहेबथोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख़ व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासहजिल्ह्यातील अन्य 9 आमदारांना पाठवले आहे. मेंढपाळांना पिस्तुल व त्याचा परवानादेण्याची त्यांची मागणी मेंढ़पाळांचे व त्यांच्या मेंढ्यांचे हिंस्त्र श्‍वापदांपासूनरक्षण करण्यासाठी गरजेची असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
महाविकास आघाडीच्या सरकारचे पावसाळी अधिवेशनसोमवारपासून सुरू होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर धनगर समाजाला अनुसूचित जमातीचेआरक्षण मिळावे व मेंढपाळांना सुविधामिळाव्यात यासाठी पावसाळी अधिवेशनात समाजाच्या विविध प्रश्‍नांचामुद्दा उपस्थित करण्याची विनंती करणारे पत्र शेंडगे यांनी जिल्ह्यातील मंत्री थोरात,गडाख व तनपुरेंसह आमदार राधाकृष्ण विखे, बबनराव पाचपुते, किरण लहामटे,आशुतोष काळे, लहू कानडे, मोनिका राजळे, संग्राम जगताप, निलेश लंके,रोहित पवार यांना पाठवले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सर्व आमदार व मंत्री यांनीधनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी तसेच मेंढपाळांच्या समस्या दूरकरण्यासाठी विधिमंडळ अधिवेशनात मुद्दा उपस्थित करावा यासाठी धनगर समाजसंघर्ष समिती नगर जिल्ह्याच्यावतीने जिल्हाध्यक्ष इंजिनिअर डी. आर. शेंडगे व समितीहे निवेदन पाठवत असून सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा, अशी मागणी यातत्यांनी केली आहे.

म्हणून पिस्तुल हवे…
याबाबत माहिती देताना शेंडगे यांनी सांगितले की,कोणाला कोणापासून धोका असेल तर सरकार संबंधितांना पोलिस संरक्षण देते,काहींना रिव्हॉल्व्हर परवानेही देते. या पार्श्‍वभूमीवर रानावनात मेंढ्यांना घेऊनफिरणार्‍या मेंढपाळांनाही बिबटे, लांडगे वा अन्य हिंस्त्र श्‍वापदांपासून भीती असते.स्वतःच्या जीवाच्या रक्षणासह मेंढ्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.त्यामुळे मेंढपाळांना पिस्तुल व त्याचा परवाना देणे आवश्यक आहे. हा मुद्दाविधानसभा अधिवेशनात गांभीर्याने मांडण्यासाठी जिल्ह्यातील मंत्री व आमदारांना पत्रदिले आहे, असेही त्यांनी सांगितले. धनगर समाजाचा अनुसूचित जमातीच्या आरक्षणअंमलबजावणीचा प्रश्‍न 70 वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारकडेआरक्षण नियोजनात अंमलबजावणीसाठी शिफारस पाठवावी तसेच मेंढपाळांचेचारा, विमा व सुरक्षेचे जे प्रश्‍न आहेत, ते सरकारने या अधिवेशनात निकाली काढावेत,अशी मागणी असल्याचेही शेंडगे यांनी सांगितले.

पत्रात व्यक्त केली अपेक्षा
शेंडगे यांनी मंत्री व आमदारांना पाठवलेल्या पत्रातम्हटले आहे की, आपला मतदारसंघ हा धनगर व मेंढपाळबहुल मतदारसंघ असून हीजमात 70 वर्षांपासून अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहे. समाजाचा शैक्षणिक,आर्थिक, सामाजिक व राजकीय विकासखुंटलेला आहे तसेच मेंढपाळ व मेंढ्यांवरबिबट्यांचे हल्ले होत आहेत, त्यामध्ये मेंढपाळ वमेंढ्या जखमी होत आहेत व मरण पावत आहेत. त्यामुळे आपणपावसाळी अधिवेशन 2021 मध्ये ’धनगड’ऐवजी ’धनगर’ ही दुरुस्ती करून राज्य सरकारनेतात्काळ ही शिफारस व प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा तसेच मेंढपाळांनासरकारने मोफत पिस्तुल व परवाना द्यावा, मेंढ्या व मेंढपाळांचा विमा सरकारनेस्वखर्चाने काढावा, हे मुद्दे उपस्थित करून समाजाची बाजू विधानसभेत मांडूनन्याय देताल, ही अपेक्षा सर्व समाज बांधव व्यक्त करीत आहोत, असे यात स्पष्ट करण्यातआले आहे.

COMMENTS