Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माऊली प्राथमिक विद्यालय व आदर्श बालवाडी मध्ये रंगला आषाढी एकादशीचा सोहळा

बीड प्रतिनिधी - आदर्श बालवाडी व माऊली प्राथमिक विद्यालय बीड मध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी व पालखी सोहळा संप्पन्न झाला.यावेळी विठ्ठल रखुमाई पालखीचे

फोन चार्जला लावणं पडलं महागात, 9 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृत्यू
पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा परिपूर्ण करावा – उपमुख्यमंत्री फडणवीस
महायुतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला ?

बीड प्रतिनिधी – आदर्श बालवाडी व माऊली प्राथमिक विद्यालय बीड मध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी व पालखी सोहळा संप्पन्न झाला.यावेळी विठ्ठल रखुमाई पालखीचे पूजन करून सुरुवात झाली. शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी विठ्ठल,रखुमाई तसेच विविध संत व वारकर्‍यांच्या वेशभूषा साकारल्या.शाळेची दिंडी राजीव गांधी मार्गे,इंदिरानगर,कॅनॉल रोड,तुळजाई चौक,नवगण कॉलेजमार्गे भाग्यनगर,चाणक्यपुरी मार्गे गोविंदनगर येथील विठ्ठल रुखुमाई मंदिरात दर्शनासाठी पोहोचली.त्याठिकाणी शाळेचे मुख्याध्यापक संतोष माने यांनी आषाढी एकादशीनिमित्त कार्यक्रमाचा उद्देश समजावून सांगितला. शाळेतील सहशिक्षिका थिटे संजीवनी,शाळेतील विद्यार्थिनी अनागता सुरवसे,सिद्धी जटाळ,सई जटाळ,काव्यश्री उबाळे यांनी गीतगायन व अभंगगायन केले.यानंतर विद्यार्थ्यांनी दर्शन घेऊन शाळेकडे प्रस्थान केले.यानंतर शाळेमध्ये अल्पोपहाराचे नियोजन करण्यात आले होते.अल्पोपहारानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळेच्या सहशिक्षिका आवाड वंदना,थिटे संजीवनी,वायखिंडे अंकिता,स्वामी योजना,मोराळे प्रतिभा,सहशिक्षक सचिन पवार,रमाकांत डोळस,अहिरे सर यांचे सहकार्य लाभले.

COMMENTS