Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपुरात आज माजी खा. स्व. एस. डी. पाटील जयंती : अ‍ॅड. धैर्यशील पाटील

माजी खा. स्व. एस. डी. पाटील इस्लामपूर / प्रतिनिधी : वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व. खा. एस. डी. पाटील यांची 113 वी जयंती आणि 37 व्या रा

सातार्‍यात सुपर मार्केटमधील वाईन विक्री विरोध व्यसन मुक्त युवक संघाचे दंडवत-दंडुका आंदोलन
महाबळेश्‍वरमध्ये मतदान जागृतीसाठी सायकलसह बाईक रॅली
जनतेचे प्रश्‍न समजण्यासाठी जयंतरावांनी स्वतंत्र स्वीय सहायक नेमावा
माजी खा. स्व. एस. डी. पाटील

इस्लामपूर / प्रतिनिधी : वाळवा तालुका शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व. खा. एस. डी. पाटील यांची 113 वी जयंती आणि 37 व्या राज्यस्तरीय हॉकी – स्पर्धेचा प्रारंभ माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या हस्ते आज 23 जानेवारीला सकाळी 9 वाजता होणार असल्याची माहिती सहसचिव अ‍ॅड. धैर्यशील पाटील यांनी दिली.
अ‍ॅड. धैर्यशील पाटील म्हणाले, संस्थेच्या प्रांगणात जयंती समारंभ तर विद्यामंदिर हायस्कूलच्या मैदानावर हॉकी स्पर्धा होतील. 26 जानेवारीला सायंकाळी हॉकी महाराष्ट्रचे सचिव मनीष आनंद यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होईल. विजेत्या संघास 37 हजार रुपये व एस. डी. पाटील सुवर्ण चषक तर उपविजेत्या संघाला 26 हजार रुपये व रौप्य चषक दिला जाणार आहे. तसेच उपांत्य फेरीत पराभूत होणार्‍या दोन संघांना प्रत्येकी 5 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेमध्ये यजमान इस्लामपूरसह पुणे, नागपूर, मुंबई, नांदेड, कोल्हापूर, इचलकरंजी, येथील मातब्बर संघांचा सहभाग असणार आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूस सामना वीर पुरस्कार दिला जाईल. राष्ट्रीय हॉकीपटू संजयकाका पाटील, संजय चरापले, संजय चव्हाण, संजय कबुरे, राजेंद्र खंकाळे, जयवंत जाधव, नदीम पटवेकर, विजय सावंत, प्रशांत जाधव, प्रताप पाटील, सत्वशील पाटील, सत्यजित पाटील संयोजन करत आहेत.
विशेषांकाचे प्रकाशन
अ‍ॅड. पाटील म्हणाले, मुख्य जयंती समारंभात संस्थेचे सचिव अ‍ॅड. बी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या ’शब्द अंतर्यामी’ या विशेषांकाचे प्रकाशन पोळ यांच्या हस्ते होईल. यावेळी संस्थेचे निवृत्त कर्मचारी, विशेष प्राविण्य प्राप्त सेवक, विद्यार्थी व खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे. संस्थेचे अध्यक्ष प्रकाशभाई शहा व कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित असतील.

COMMENTS