Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जिंकून दाखवू

अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांचा निर्धार

पाथर्डी/प्रतिनिधी ः कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार मागील पाच वर्षांनी कसा केला याचा हिशोब योग्य वेळी जनतेसमोर मांडून त्या मागील 18 वर्षे त

कालवा सल्लागार समिती बैठक तातडीने व्हावी ः स्नेहलता कोल्हे
वकीलांचा आज न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार
राष्ट्रीय दृष्टिहीन संघाच्या महिला मेळाव्यात अंधांनी दिला सक्षमतेचा नारा

पाथर्डी/प्रतिनिधी ः कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार मागील पाच वर्षांनी कसा केला याचा हिशोब योग्य वेळी जनतेसमोर मांडून त्या मागील 18 वर्षे तुम्ही बाजार समितीतील कामकाज कशा पद्धतीने हाताळला हेही एका दिवसात उघड करू बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून पूर्ण ताकदीनिशी लढवून जिंकून दाखवू असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापराव ढाकणे यांनी व्यक्त केला.
तालुका बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यातील प्रमुख महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक ढाकणे यांच्या निवासस्थानी पार पडली यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे,ठाकरे गटाच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख भगवानराव दराडे, जिल्हा उपप्रमुख राजेंद्र मस्के रफिक शेख माजी पंचायत समिती सदस्य वसंतराव खेडकर,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रवींद्र म्हस्के, अजिनाथ खेडकर,वैभव दहिफळे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख,अमोल वाघ,राहुल गवळी, बंडू पाटील बोरुडे यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. ढाकणे म्हणाले ज्यावेळी बाजार समितीचे सत्ता ताब्यात आली तेव्हा ही संस्था 12 लाख रुपये तोट्यात होती.अनेक गैर कारभार या मागच्या काळात झाले होते त्याचे निराकरण करता करता दोन वर्षे लागली तोट्यातली संस्था नफ्यात आणून दाखवली. दुष्काळी भागातील संस्था असल्याने उत्पन्नाचे सर्व अतिशय कमी होते ते वाढवण्यासाठी प्रयत्न केले अक्षरशः तारेवरची कसरत करून संस्था आर्थिक दृष्ट्या व्यवस्थित वळणावर आणली.संस्थेच्या माध्यमातून आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात,परंतु एक तरी रुपयाचा भ्रष्टाचार आम्ही केलेला दाखवा याउलट तुमच्या ताब्यातील अठरा वर्षांचा कार्यकाळ किती काळाकुट्टआहे हे लवकरच आपण जनतेसमोर आणणार आहोत.आमदार निधीचा हिशोब मागितला तर आम्ही विचारणार कोण असा सवाल आम्हाला करता मी पण या भागाचा नागरिक आहे त्या अधिकार्‍यांना शासनाच्या निधीचा हिशोब लोकप्रतिनिधींना मागणं माझा अधिकार आहे.जिल्हा बँकेच्या माध्यमातून विविध गावातील सेवा संस्थांच्या सभासदांना विठीस धरता हडपशाहीने सत्ता बळकवली जाते. हे आता इथून पुढे चालणार नाही माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील व माजी मंत्री आमदार प्राजक्ता तनपुरे यांच्या सहकार्यातून बाजार समितीची सत्ता शेतकर्‍यांच्या हितासाठी पुन्हा मिळवू या संस्थेच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रयत्न अविरतपणे सुरूच ठेवू असे ढाकणे म्हणाले. शिवशंकर राजळे म्हणाले मागील बाजार समितीची निवडणूक आमच्यासाठी प्रचंड अवघड मानली गेली मात्र मतदारांच्या मनात सुक्त लाट होती त्याचे रूपांतर आम्हाला सत्ता मिळण्यात झालं यावेळी तसेच लाट जनतेच्या मनात आहे संवाद यात्रेच्या निमित्ताने हे आम्हाला प्रकर्षाने जाणवत आहे. घाबरून न जाता कितीही धाक धापट सही दाखवली तरी मतदार राजा हा महाविकास आघाडीच्या मागे भक्कमपनाने उभे राहील अशी खात्री आम्हाला आहे. बाजार समिती निवडणूक साठी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी आमच्या सोबत राहणार आहे.आभार माजी नगरसेवक बंडू पाटील बोरुडे यांनी मानले.

COMMENTS