फलटण / प्रतिनिधी : फलटण ग्रामीण पोलिसांनी वाजेगाव निंबळक, ता. फलटण गावच्या हद्दीत बेकायदा बिगरपरवाना किराणा दुकानामध्ये गुटखा विक्री करणार्या ठि
फलटण / प्रतिनिधी : फलटण ग्रामीण पोलिसांनी वाजेगाव निंबळक, ता. फलटण गावच्या हद्दीत बेकायदा बिगरपरवाना किराणा दुकानामध्ये गुटखा विक्री करणार्या ठिकाणी छापा टाकून सुमारे 1 लाख 33 हजार 471 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमधून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांना त्यांचे खास बातमीदार मार्फत बातमी मिळाली की वाजेगाव निंबळक, ता. फलटण गावचे हद्दीत केशव विठोबा गायकवाड, रा. वाजेगाव निंबळक, ता. फलटण हा त्याचे सुरज किराणा जनरल स्टोअर्स दुकानामध्ये गुटख्याची चोरटी विक्री करत आहे, अशी माहिती मिळाली. त्या ठिकाणी छापा टाकला असता सूरज किराणा जनरल स्टोअर्स या दुकानाचे बाहेर असलेल्या जिन्याखाली 21 हजार 798 रुपये किंमतीचा गुटख्याचा साठा आढळून आला. पोलिसांनी मुद्देमाल व संशयित आरोपीस ताब्यात घेवून केशव विठोबा गायकवाड (वय 60, रा. वाजेगाव निंबळक, ता. फलटण) यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साो. फलटण यांच्यासमोर हजर केले. न्यायालयाने संशयितास पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
संशयितास विश्वासात घेवून माल कोणाकडून खरेदी केला याबाबत विचारपुस केली असता गायकवाड याने फलटण येथील संतोष दोशी यांच्या दुकानातून घेतल्याची कबूली दिली. त्यानंतर संतोष रतनलाल दोशी यांच्या दुकानात गेल्यावर दुकाना शेजारील त्यांच्या राहत्या घरातील गोडाऊनमध्ये एकूण 1 लाख 11 हजार 673 रूपये किंमतीचा गुटखा आढळून आला. हा मुद्देमाल जप्त करून संशयितास अटक करण्यात आली.
पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांच्या सुचनेनुसार व अप्पर पोलीस अधिक्षक सातारा अजित बोर्हाडे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे व फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या सुचनेनुसार सपोनि अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे, उर्मिला पेदाम, दादासो यादव, अभिजीत काशिद, राजेंद्र गायकवाड, अमोल जगदाळे व गणेश अवघडे यांनी ही कारवाई केली आहे.
COMMENTS