अधिक चांगला वृद्धाश्रम असेल, तर राज्यपाल कोश्यारी यांना तिकडे पाठवा 

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अधिक चांगला वृद्धाश्रम असेल, तर राज्यपाल कोश्यारी यांना तिकडे पाठवा 

राज्यपालांच्या सडक्या मेंदूमागे कोण?

मुंबई प्रतिनिधी - अधिक चांगला वृद्धाश्रम असेल, तर राज्यपाल कोश्यारी यांना तिकडे पाठवा, असा खोटक टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी लगाव

मातंग समाजाच्या प्रगतीतून आणखी महापुरुष निर्माण होतील – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रुजविलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता ही तत्त्वे सर्वव्यापी – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी 
राज्यपाल कोश्यारी यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या – शरद पवार

मुंबई प्रतिनिधी – अधिक चांगला वृद्धाश्रम असेल, तर राज्यपाल कोश्यारी यांना तिकडे पाठवा, असा खोटक टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी लगावला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. राज्यपालांच्या सडक्या मेंदूमागे कोण, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे म्हणाले, केंद्रातील सरकारची माणसं ही वेगवेगळ्या राज्यांत पाठविली जातात. या माणसांची कुवत काय असते. पात्रता काय असते. खास करून ज्येष्ठ नागरिकांबद्दल बोलतोय,  राज्यपाल म्हणण मी त्यांना सोडून दिलंय. कारण राज्यपाल पदाची झुल पांघरली म्हणजे त्यांनी काहीही वेडवाकडं बोलावं. हे काही महाराष्ट्र मान्य करणार नाही. कोश्यारी यांनी मुंबई, ठाण्यातील मराठी माणसाचा अपमान केला होता. तेव्हा कोल्हापुरी जोडा दाखविण्याची वेळ आल्याचं म्हटलं होतं. त्यानंतरही हे महोदय थांबले नाहीत. असा टोला ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांना लगावला.

COMMENTS