Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वीज पडून पती-पत्नी आणि दोन चिमुकल्यांचा मृत्यू

गडचिरोली- लग्न कार्यक्रम आटोपून गावाकडे परत जात असताना झाडाखाली थांबलेल्या पती-पत्नी आणि दोन मुलांवर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. गडचिर

शांतता करार हवेत विरला! २४ तासांत अमेरिकेचा इराणवर सलग दुसरा एअर स्ट्राईक; होर्मुजची सामुद्रधुनी युद्धाच्या छायेत। लोकमंथन News२४
इराणचे नेतृत्व एका हल्ल्यात संपवू शकतोखामेनेईंच्या अंत्यसंस्कारादरम्यान ट्रम्प यांचा इशारा
स्वदेस चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या अभिनेत्री गायत्री जोशीचा इटलीत अपघात

गडचिरोली- लग्न कार्यक्रम आटोपून गावाकडे परत जात असताना झाडाखाली थांबलेल्या पती-पत्नी आणि दोन मुलांवर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील तुळशी फाटा येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. भारत राजगडे (35 वर्ष), अंकिता भारत राजगडे (28 वर्ष), बाली भारत राजगडे (2 वर्ष), देवाशी भारत राजगडे (4 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. भारत राजगडे हे आपल्या पत्नीसह दोन मुलांना घेऊन लग्न कार्यक्रमासाठी गेले होते.

लग्नावरुन सायंकाळी गावाकडे परत जात असताना अचानक मेघगर्जना आणि वादळ सुरू झाले. त्यामुळे त्यांनी रस्त्यालगच्या झाडाचा आसरा घेतला. यावेळी वीज कोसळल्याने चौघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेत संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने आमगाव बुटी गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली

COMMENTS