Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांना लोकनेता म्हणत सन्मान

निशिकांतदादासह अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावरइस्लामपूर / प्रतिनिधी : सोमवारी उरूण-इस्लामपूर नगरपरीषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पा

घरफोडी प्रकरणातील पाच वर्षे फरारी संशयितास अटक
स्वातंत्र्य वीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांना जाहीर
पाटण तालुक्यातील जनतेचे जीवन उध्दवस्त होणार? पाटण तालुका नक्षलग्रस्त घोषित करा.

निशिकांतदादासह अनेक कार्यकर्त्यांना अश्रू अनावर
इस्लामपूर / प्रतिनिधी : सोमवारी उरूण-इस्लामपूर नगरपरीषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांचा लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपला. त्यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाचा गौरव म्हणून शहरवासियांनी लोकनेता म्हणत सन्मान केला. निशिकांतदादांनी शहरातील सर्व नागरीकांचे ऋण व्यक्तकरत शेवटच्या श्‍वासापर्यत शहराच्या विकासासाठी कटिबध्द रहाणार असून नागरीकांच्या प्रश्‍नांसाठी यापुढे ही सदैव तत्पर असेन अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अश्रू आवरता आले नाहीत.
गेल्या पाच वर्षात शहरातील भुयारी गटर योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभिकरण, मटण मार्केट, समाज मंदिरे, शहराला जोडणारे रस्ते रुंदीकरण, अंतर्गत रस्ते, ट्रॉफीक सिग्नल, उपनगरातील रस्ते, स्ट्रीट लाईट, अनुकंपाखालील कर्मचार्‍यांच्या वारसांना नोकरीची संधी, नगरपरीषदेच्या कर्मचार्‍यांना बोनस देण्याची प्रथा अशी महत्वपुर्ण कामे मार्गी लावली.
याचबरोबर भाजी मंडई, पार्कींग व्यवस्था, 24 बाय 7 पाणी योजना असे प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले. थेट प्रेक्षेपण ठेवून शहरवासीयांना विश्‍वास दिला. नागरीक व लोकप्रतिनिधी यांच्यातील अंतर कमी करुन नागरिकांचा सन्मान केला. म्हणूनच निशिकांतदादांना लोकनेता म्हणावे लागेल. अशा अनेक कार्यकर्त्यांनी व शहरातील नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांचे त्यांच्या नगराध्यक्ष दालनात शहरातील महीला भगिनींनी औक्षण करत त्यांच्या गेल्या पाच वर्षातील कामाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरपरिषदेचा परीसर फटाक्याच्या आताषबाजीने व निशिकांतदादांच्या जयघोषणाने दणादुण गेले. यावेळी निशिकांत पाटील यांनी नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराला नमस्कार करत सर्व नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानत अनेकांना प्रेमाने अलिंगन देत नाते घट्ट केले.
यावेळी भाजपाचे शहर अध्यक्ष अशोकराव खोत म्हणाले, दादा खरचं आम्ही भाग्यवान आहोत. तुमच्यासारखा लोकनियुक्त नगराध्यक्ष आम्हाला लाभला. गेल्या पाच वर्षात शहराचा विकास चौफेर झाला. नागरिकांना एक विश्‍वास दिला. अनेकांची वर्षानुवर्षे प्रलंबीत असलेली कामे मार्गी लावली. शहरातील नागरीकांना स्वाभिमानाने व अभिमानाने जगण्याचा मंत्र दिला. तुम्ही तुमच्या कुटुंबाचे दादा नाही राहीलात तर तुमच्या कामातुन तुम्ही शहराचे दादा झालात. आपल्या कामातून शहरातील नागरीकांसाठी खर्‍या अर्थाने तुम्ही लोकनेता झाला. आपल्या विचारातून दूरदृष्टीतून असाच शहराचा व तालुक्याचा विकास घडत राहो.
यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख गटनेते आनंदराव पवार, नगरसेवक वैभव पवार, शकील सय्यद, प्रदीप लोहार, मंगल शिंगण, अन्नपुर्णा फल्ले, सिमा पवार, वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे, युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना तालुका प्रमुख सागर मलगुंडे, इस्लामपूर भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सतेज पाटील, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा स्मिता पवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर हुबाले, प्रांजली अर्बन निधी बॅकेचे चेअरमन संदीप सावंत, संचालक भास्कर मोरे, भाजपा जिल्हा सरचिटणीस संजय हवलदार, उमेश रायगांधी, यदुराज थोरात, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण माने, युवा नेते अजित पाटील, प्रविण परीट, अक्षय पाटील, अक्षय कोळेकर, फिरोज पटेल, संदीपराज पवार, गौरव खेतमर, विकास परीट, स्वप्निल मोरे, अभिजीत खडके, सोमनाथ जाधव, धनाजी पाटील, सुयश पाटील, आण्णा कुंडले, रवि पिसाळ, विकास पाटील यांच्यासह मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS