Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धोकादायक इमारती पाडण्यास सुरुवात

लातूर प्रतिनिधी - पावसाळ्यात जुन्या व जीर्ण इमारती कोसळून दुर्घटना होऊ शकते, हे लक्षात घेता अशा इमारती तात्काळ उतरवून घेण्याच्या नोटीसा लातूर शह

पवारांच्या पायाला दुखापत झाल्याने गाड्या रेस ट्रॅकवर
‘झोपु’ योजनांसाठी आठ वित्तीय संस्थांची तयारी
माजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कराड पालिकेच्या अधिकारी-कर्मचार्‍यांचा सत्कार

लातूर प्रतिनिधी – पावसाळ्यात जुन्या व जीर्ण इमारती कोसळून दुर्घटना होऊ शकते, हे लक्षात घेता अशा इमारती तात्काळ उतरवून घेण्याच्या नोटीसा लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने संबंधितांना दिल्या होत्या. त्यानुसार कांही मालमत्ताधारकांनी आपल्या जुन्या इमारती उतरवून घेण्यास दि. 30 जुलैपासून सुरुवात केली आहे. पावसाळ्यात जुन्या इमारती कोसळून जीवित व वित्त हानी होऊ शकते. इर्शाळवाडीसारखी दुर्घटना घडू शकते, अशा दुर्घटना टाळण्यासाठी लातूर शहर महानगरपालिका दरवर्षी अशा मालमत्ताधारकांना नोटिसा देते. यावर्षीही मनपाने अशा जीर्ण इमारतीच्या मालकांना नोटीसा दिल्या होत्या. संबंधितांनी इमारती पाडल्या नाहीत तर मनपाकडून त्या पाडण्यात येतील. तसेच त्या खर्चाचा बोजा संबंधित मालमत्तेवर लावण्यात येईल, असे या नोटीसित सूचित करण्यात आले होते. संबंधित इमारतींवर नोटिसा डकविण्यात आल्या होत्या. त्यानंतर स्मरणपत्रेही पाठवली होती.
शहरातील आझाद चौकातील गोपाळ हरिकिशन अग्रवाल यांनाही अशाच पद्धतीने नोटीस देण्यात आली होती. दि. 16 जुलै रोजी पहिली व 24 जुलै रोजी दुस-यांदा नोटीस देण्यात आल्यानंतर मनपा आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी याचा आढावा घेतला होता. आयुक्तांनी केलेल्या सूचनेप्रमाणे झोन ‘डी’ चे झोनल अधिकारी बंडू किसवे यांनी संबंधित मालकांना पुन्हा एकदा या इमारती उतरवून घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार इमारत मालक गोपाळ हरिकिशन अग्रवाल यांनी रविवार दि. 30 जुलै रोजी स्वत: इमारत पाडण्यास सुरुवात केली. यामुळे या परिसरातील धोका कमी होणार आहे. जुने लातूर म्हणून ओळख असलेल्या गावभागात सर्वाधिक जीर्ण झालेल्या धोकादायक इमारती आहेत. गावभाग धोकादायक इमातींच्या विळख्यात आले. पावसाळ्यात अशा इमारती ढासळून जिवीत व वित्त हानी होऊ होऊ शकते. गावभागात सुमारे 80 पेक्षा अधिक इमारतील धोकादायक आहेत. त्यापैकी 5 ते 7 इमारती अतिधोकादायक आहेत. या इमारती पाडून घ्याव्यात, अशा नोटीसा संबंधीतांना मनपा प्रशासनाने दिल्या आहेत. लातूर शहरातील जुन्या आणि धोकादायक इमारतीमुळे पावसाळ्याच्या दिवसात निर्माण झालेला धोका लक्षात घेता महापालिकेने तातडीने योग्य ती कारवाई करावी व संभाव्य नुकसान टाळावे, अशा सूचना राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मनपा आयुक्तांना पत्र पाठवून दिल्या आहेत. या सूचनांची दखल घेत मनपा प्रशासनाने तातडीने कार्यवाही सुरु केली आहे आणि रविवारी गावभागातील धोकादाय इमाराती पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

COMMENTS