23 टक्के महागाई तर 27 टक्के तरूण बेरोजगारांची वणवण नवी दिल्ली : देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच
23 टक्के महागाई तर 27 टक्के तरूण बेरोजगारांची वणवण
नवी दिल्ली : देशामध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतांना आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा एक अहवाल समोर आला असून, यामध्ये भारतातील महागाई आणि बेरोजगारीवर बोट ठेवले आहे. एका सर्वेक्षणातून देशामध्ये 23 टक्के आणि 27 टक्के तरूण बेरोजगारांची वणवण सुरू असल्याचे म्हटले आहे, त्यामुळे ऐन निवडणुकीत बेरोजगारी आणि महागाई कळीचे मुद्दे असून, त्यानंतर विकास आणि हिंदुत्व, राम मंदिर यासारख्या प्रश्नांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे समोर आले आहे.
बेरोजगारी आणि महागाईया मुद्यावरून जर नागरिकांनी मत देतांना विचार केला तर भाजप अडचणीत येऊ शकते. तर विकास या मुद्यावरून भाजपला फायदा होऊ शकतो तर हिंदुत्वमुळे 2 टक्के तर राम मंदिर मुद्यामुळे 8 टक्के फायदा होऊ शकतो असे या एक सर्वेक्षणातून पुढे आले आहे. देशातील तरुण लोकसंख्येवर बेरोजगारीचा लक्षणीय परिणाम होत आहे, असल्याचे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालात माहिती पुढे आली आहे. सीएसडीएस लोकनीतीने या बाबत सर्वेक्षण केले असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बेरोजगारी, महागाई व विकास हे तीन मुद्दे महत्वाचे आणि आव्हान देणारे ठरणार आहेत. बेरोजगारी व महागाई सत्ताधारी भाजपला छळणार आहेत. या सर्वेक्षणात नागरिकांनी ’विकास’ हा मुद्दा महत्वाचे असल्याचे म्हटले आहे. यासाठी ते भाजपला मत देऊ शकतात. तर ग्रामीण भागातील नागरिक बेरोजगारी व महागाईचा मुद्दा मोठा आणि भीषण असल्याचे म्हणत आहेत. सीएसडीएस-लोकनीतीच्या सर्वेक्षणात 2 टक्के हिंदुत्व व राम मंदिराचा मुद्दा 8 टक्के महत्वाचा राहील असे म्हटले आहे. देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढत चालली आहे. बेरोजगारी ही गेल्या विधानसभा निवडणुकीत महत्वाचा विषय होता. अनेक तरुण नोकरीसाठी भटकंती करत असून त्यांना मनासारखे काम मिळत नसल्याचे, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालात पुढे आले आहे. या अहवालानुसार देशात 2022 मध्ये लोकसंखेच्या तुलनेत 82.9 टक्के तरुणांचा बेरोजगारीत वाटा होता. सर्वेक्षणात तरुणांनी असे म्हटले आहे की, गेल्या 5 वर्षात काम मिळवणे कठीण झाले आहे. फक्त 12 लोकांनी नोकरी मिळवणे सोपे असल्याचे म्हटले आहे. देशात हा महत्वाचा मुद्दा असतांना मात्र, याकडे दुर्लक्ष करून मोदी सरकारणे प्रचारात हा मुद्दा दुर्लक्षित केला आहे. या सोबत विकास हा मुद्दा देखील महत्वाचा आहे. सर्वेक्षणात 10 पैकी 2 मतदारांना गेल्या पाच वर्षांत देशात विकास झाला नसल्याचे वाटते. तर 32 टक्के मतदारांना विकास केवळ श्रीमंतांसाठी’ झाला असे वाटत आहे.
भ्रष्टाचार वाढल्याचे नागरिकांचे मत
या सर्वेक्षणातून अनेक बाबी स्पष्ट होत असून, यात केवळ 8 टक्के नागरिकांनी भ्रष्टाचार व अयोध्येतील राम मंदिराबाबत बोलले आहे. मोदी सरकारच्या काळात गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचार वाढला असल्याचे बहुतांश नागरिकांचे मत आहे. तर शेतकार्यांच्या किमान आधारभूत किमतीच्या हमीबाबत सुरू असलेल्या आंदोलनावरून देखील नाराजी आहे. 63 टक्के शेतकर्यां आंदोलनाच्या मागण्या खर्या असल्याचे म्हटले आहे. तर 11 टक्के शेतकर्यांनी हे आंदोलन म्हणजे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे.
COMMENTS