Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बहुआयामी व्यक्तीमत्व

नवभारताचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती सोहळा केवळ देशातच नव्हे तर जगभरात उत्साहात साजरा होत आहे. महामानव डॉ. आंबेडकरांचे जयंती सोह

राज्यपालांचा मराठीद्वेष
महाविकास आघाडीतील फूट ?
माणूसकी ओशाळली

नवभारताचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती सोहळा केवळ देशातच नव्हे तर जगभरात उत्साहात साजरा होत आहे. महामानव डॉ. आंबेडकरांचे जयंती सोहळा जगभरात साजरा होण्याचे प्रमुख कारण म्हणजे या देशामध्ये हजारो वर्ष एक समाज शोषित होता, पीडित होता. हजारो वर्ष या समुदायाचे शोषण इथल्या प्रस्थापितांकडून होत होते, त्यांना एक नागरिक म्हणून जगण्यासाठी मिळणार्‍या सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नव्हत्या, त्यांना पिण्याचे पाणी नाकारण्यात आले होते, तर मग या समाजाला आरोग्य, शिक्षणाच्या सोयी दूरच होत्या. अशा या समाजाला त्यांचे हक्क डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून मिळवून दिले. मात्र त्याआधी बाबासाहेबांनी चळवळीच्या माध्यमातून संघर्ष केला. मग तो संघर्ष चवदार तळ्याचा असेल, किंवा आम्हाला मंदिरात जाण्याचा हक्क मिळाला पाहिजे, यासाठी काळाराम मंदिर सत्याग्रह असेल. या आंदोलनातून बाबासाहेबांना दलितांच्या हक्कांसाठी पोषक वातावरणनिर्मिती केली. आणि संविधानाच्या माध्यमातून ते हक्क त्यांना मिळवून दिले. त्यामुळेच हा समाज आज ताठमानेने, स्वाभिमानाने जगतांना दिसून येत आहे. डॉ. आंबेडकरांनी केवळ दलितांना त्यांचे हक्कच मिळवून दिले नाहीत, तर डॉ. आंबेडकरांचे देशाच्या उभारणीत मोठे योगदान आहे. जलसंधारणाच्या बाबतीत त्यांनी केलेले काम, त्यांनी सुचवून ठेवलेले पर्याय नजरेआड करता येणार नाही. त्यामुळे बहुआयामी व्यक्तीमत्वाची जयंती जगभर साजरी होते. कामगार, शेतकरी, कायदे, अर्थशास्त्र, धर्मशास्त्र, अशा सर्वच क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी अमूल्य असे योगदान दिले आहे. शेतकरी हा सुखी आणि समृद्ध होण्यासाठी त्याच्या मालाला योग्य भाव मिळावा.त्यांच्या प्रश्‍न यांना न्याय मिळावा.म्हणुन ब्रिटिश यांच्यासमोर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकर्‍यांच्या व्यथा मांडल्या होत्या. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार हा कायम शेतकर्‍यांच्या हितालाच न्याय मिळवून देणारा होता. एवढेच नव्हे तर राज्यघटनेत ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकरी हिताचे कायदे तयार केलेले आहेत. परंतु सरकारी यंत्रणेतून त्या राज्यघटनेतील तरतुदी यांची अंमलबजावणी ही ज्या पद्धतीने व्हायला हवी आहेत. ती होताना दिसत नाहीत.पाण्याच्या नियोजनावर ही शेतकर्‍यांची शेती अवलंबून असते म्हणुन दुष्काळ सदृश्य परिस्थिती हटविन्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पाण्याचे नियोजन करण्याच्या उपायोजना ही आखल्या होत्या .पाण्याचे प्रकल्प उभारणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जलतज्ज्ञ म्हणुनही ओळखले जातात. कोकणांत खोतांचे वर्चस्व होते. त्यामुळे येथील शेतकरी नागविला जात होता. कुळांनी जमीन कसायची आणि 75 टक्के वाटा सावकारांना द्यायचा, अशी अमानुष पध्दत सुरू होती. या अमानुष प्रथेविरूद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली 14 एप्रिल 1929 रोजी कोकणात शेतकरी परिषद आयोजित करण्यात आली होती. येथुनच खर्या अर्थांने खोतप्रथेविरूद्ध आंदोलनाला सुरूवात झाली. खोती पध्दत नष्ट करणार्या कायद्याचे विधेयक डॉ. बाबासाहेबांनी 17 सप्टेंबर 1937 मध्ये विधीमंडळात मांडले, व ते विधेयक मंजूर करून घे×ण्यात आले. 10 जानेवारी 1938 रोजी 25,000 शेतकर्यांचा विराट मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळावर नेण्यात आला. अशा पध्दतीने डॉ. बाबासाहेबांचा शेतकर्यांविषयीचा दृष्टीकोन हा उदात्त होता, ज्यामुळे शेतकरी हा स्वालंबी होईल. मात्र काळाच्या ओघात शेतकर्यांना मदतीचे तुकडे देत, त्यालाच कधीच स्वालंबी बनू दिले नाही, पर्यायाने शेतकरी कायमच उपेक्षित राहिला. जलसंधारणाचे महत्व ओळखून सुक्ष्म नियोजन करत, भाक्रा नांगल धरण, हिराकूड प्रकल्प, महानदी प्रकल्प या सर्व प्रकल्पांची योजना, आखणी, मांडणी, आणि पूर्णत्वास नेणारे डॉ. आंबेडकर. शेती अन् शेतजमीनींचे राष्ट्रीयकरण करण्याची योजना सुद्धा त्यांचीच. उभारलेल्या धरणांतून उपसा सिंचनाद्वारे वीज निर्मिती शक्य करून दाखवणारे सुद्धा डॉ. बाबासाहेबच होते. त्यामुळे बाबासाहेब केवळ एका वर्गांचे नेते नसून, त्यांची समस्त भारतांचा विचार करत, येथील साधनसामुग्रीचा विचार करून देशाला एका उंचीवर नेण्याचे काम सातत्याने बाबासाहेबांनी केले. अशा या बहुआयामी व्यक्तीमत्वाला विनम्र अभिवादन.

COMMENTS