Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हसवडमध्ये धुवांधार पाऊस; जनजीवन विस्कळीत

गोंदवले / वार्ताहर : म्हसवडमध्ये आज सुमारे एक तास झालेल्या धुवांधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होत

सातार्‍यात मद्य विक्रीच्या धोरणास ‘अंनिस’चा विरोध
कोपरगावमध्ये ८ मे पर्यंत कडक जनता कर्फ्यु
सातारा जिल्हा पोलीस दल राज्यात प्रथम

गोंदवले / वार्ताहर : म्हसवडमध्ये आज सुमारे एक तास झालेल्या धुवांधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचल्याने काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. म्हसवड शहरात आज दुपारी ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाटासह अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे म्हसवड व परिसरात जनजीवन विस्कळित झाले.
आज दुपारी अचानक म्हसवड व परिसरात ढगांचा गडगडाट विजांचा लखलखाटासह एक तास मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. म्हसवडमधील मुख्य पेठेतील रस्त्यावर पाणी वाहत होते. हा रस्ता आहे का नदी वाहते, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अगोदरच डेंग्यूचा प्रादुर्भाव कमी नाही. तोवर पुन्हा पावसाने थैमान घातले असल्याने ठिकठिकाणी पाणी साचत असल्याने विविध आजारांवर निमंत्रण मिळाले आहे. पुळकोटी ओढ्यावरील पुलावरून पाणी वाहत होते. यामुळे वहातुक काही काळ ठप्प झाली होती.
गेल्या आठ दिवसापासून म्हसवड परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. काही शेतकर्‍यांचे ऊसाचे तर अनेकांचे कांदा पिकांचे नुकसान झाले. मात्र, आज दुपारी अचानक पडलेल्या मुसळधार पावसामुळे म्हसवडमधील जनजीवन विस्कळित झाले होते.
म्हसवड शहर व परिसरात परतीच्या पावसाने हजेरी लावली असून शहरात पाऊस पडत असल्याने शहरातील विजेचा खेळखंडोबा सुरु आहे. सखल भागात पावसाचे मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याचे चित्र आहे. दरम्यान, शहरात पडणार्‍या पावसामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील एका दवाखान्याची धाब्याची इमारत कोसळल्याची दुर्गघटना घडली आहे. यामध्ये फक्त इमारतीचे नुकसान झाले असून कसलीही जीवितहानी झाली नाही.
यंदा माण तालुक्यावर वरुण राजाने चांगलीच कृपादृष्टी केली असून उशीरा का होईना पण याठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावत सर्वत्र हाहाकार उडवला आहे. हत्ती नक्षत्राने तूफान फलंदाजी करत पावसाचा चांगलाच जोर वाढला आहे. आजपासुन सुरु होत असलेल्या आंधळी नक्षत्राचीही सुरुवात चांगलीच होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान परतीच्या पावसाने माण तालुक्यात चांगलीच हजेरी लावल्याने माणगंगेच्या पाणीपात्रात यामुळे चांगलीच वाढ झाली आहे. दमदार पडत असलेल्या पावसामुळे मात्र रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. पाऊस संपताच तातडीने रस्त्यांची कामे करावी, अशी मागणी माणवासीय जनता करत आहे.

COMMENTS