Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा जिल्हा पोलीस दल राज्यात प्रथम

सातारा / प्रतिनिधी : कम्युनिटी पोलिसिंगमध्ये सातारा जिल्हा पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. याबाबतचा पुरस्कार पोलीस अधीक्षक अजयकुमा

फलटणला होणारे राष्ट्रीय सामने यशस्वी पार पडतील : श्रीमंत रामराजे
सुंदरगडावर साजरा झाला शाही दसरा
माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून 5 कोटींचा निधी मंजूर

सातारा / प्रतिनिधी : कम्युनिटी पोलिसिंगमध्ये सातारा जिल्हा पोलीस दलाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. याबाबतचा पुरस्कार पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडून स्वीकारला. या पुरस्कारामुळे जिल्हा पोलिस दलाचा नावलौकिक वाढला आहे.
समाजात पोलिसांबद्दल विश्‍वास निर्माण करणे आणि नागरिकांना पोलिस हा जवळचा मित्र वाटला पाहिजे यासाठी केल्या जाणार्‍या कार्याला कम्युनिटी पोलिसिंग म्हणून ओळखले जाते. पोलीस व नागरिकांचे संबंध चांगले असले की गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्यास मदत होते. बेस्ट कम्युनिटी पोलिसिंग सोबतच सीसीटीएनएस व विविध तंत्रज्ञानाचा पोलिसांच्या कामकाजातील वापरही महत्त्वाचा असतो. त्यातून गुन्हे उघडकीस येण्यास मदत होते. विविध तंत्रज्ञानाचा वापर व गुन्ह्यांचा छडा लावण्यामध्ये जिल्हा पोलीस दलाने चांगली कामगिरी बजावली होती.
डिसेंबर 2020 या कालावधीपर्यंत विविध स्तरावर पोलिस महासंचालकांकडून श्रेणी तयार करून त्याची ‘ए’, ‘बी’, ‘सी’ अशी विभागणी केली गेली. या तीन स्तरांतून सर्वोत्कृष्ट पोलीस घटक निवडले गेले. सहा हजारांपेक्षा जास्त गुन्हे असलेल्या ‘बी’ श्रेणीमध्ये सातारा जिल्ह्याचा समावेश होता. सातारा जिल्हा पोलीस दल आणि बीड जिल्हा पोलीस दलाला संयुक्तरीत्या ‘बेस्ट युनिट इन कम्युनिटी पोलिसिंग इनिशिएटिव्ह’ने सन्मानीत करण्यात आले आहे. सातारा पोलिसांनी आजी-माजी सैनिकांच्या नातेवाईकांच्या तक्रार निवारणाची शिबिरे, पोलिसांसाठी कोविड रुग्णालय, तसेच कोरोना केअर सेंटर, कोरोना कालावधीत पारधी समाजातील लोकांसाठी धान्य वाटप, निर्भया पथकाच्या माध्यमातून महिला व मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण असे विविध प्रकारचे उपक्रम राबविले. अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी हे उपक्रम प्रभावीपणे सुरू ठेवले. जिल्हा पोलीस दलाच्या या कामाबाबत पाठविलेल्या अहवालावरून जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांक जाहीर झाला होता. पोलीस महासंचालकाडून जाहीर झालेले हे पुरस्कार नुकतेच बन्सल यांनी स्वीकारले. त्यामुळे जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किशोर धुमाळ, पोलीस कल्याण विभागाचे निरीक्षक अशोक मदने, महिला तपास पथकाच्या सहायक निरीक्षक अनिता मेणकर, उपनिरीक्षक गणेश वाघ यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचार्‍यांनी त्यासाठी परिश्रम घेतले होते.
सर्वसामान्यांच्या मनात विश्‍वास निर्माण करा
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना दिलेला हा पुरस्कार खुद्द गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आपल्या ट्विटर हॅडलद्वारे शेअर केला आहे. त्या वेळी पोलिसांनी नि:स्वार्थीपणे काम करून तक्रार घेऊन येणार्‍या सर्वसामान्यांच्या मनात विश्‍वासाचे वातारवरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. गुन्ह्यांचा वेगवान तपास करून आश्‍वासक कामगिरी केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

COMMENTS